शासन स्तरावरून पत्रकारांच्या समस्या सोडविण्यास मी कटिबद्ध आहे-आमदार बाळासाहेब मांगुळकर

सहसंपादक : रामभाऊ भोयर

यवतमाळ-पत्रकार हा जरी आरशासारखा वृत्तांकन करीत असला तरी सुद्धा त्याच्याही अनेक समस्या आहेत आणि अनेक समस्यांनी वर्तमान परिस्थितीत पत्रकार हा पिचल्या जात आहे त्यामुळे या पत्रकारांच्या हिताच्या दृष्टीने शासनाने निर्णय घ्यावेत याकरिता आपण शासन स्तरावरून पत्रकारांच्या समस्या सोडविण्यास कायम कटिबद्ध असल्याचे मत यवतमाळ विधानसभेचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी व्यक्त केले ते राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ रोजी स्थानिक टिळक स्मारक मंदिर यवतमाळ येथे आयोजित पत्रकारांचा सत्कार व पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी माजी विधानसभा उपाध्यक्ष तथा शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वसंतराव पुरके हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार अशोक उमरतकर,ओंकार चक्के पांढरकवडा नगर परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष बोरले तर प्रमुख वक्ते म्हणून दैनिक पब्लिक पोस्ट चे संपादक प्राध्यापक अंकुश मेश्राम अंकुश वाकडे व दैनिक मतदार राज्य संपादक विजय गायकवाड आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार बाळासाहेब मांगुळकर म्हणाले की वर्तमान स्थितीत पत्रकारांच्या अनेक समस्या आहेत आणि या समस्या सोडवण्यासाठी अनेक पत्रकार संघटना सरसावल्या आहेत. परंतु शासन मात्र पत्रकारांच्या समस्यांकडे डोळेझाक करतेय त्यामुळे पत्रकारांच्या समस्या कायम आहेत. त्यांच्या समस्या शासन स्तरावर सोडविण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उद्घाटक आमदार बाळासाहेब मांगुळकर व या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक वसंतराव पुरके व इतर मान्यवर यांनी पत्रकार गोपाळबाबा वलंगकर व मराठीचे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन केले. त्यानंतर नुकतेच पद्मश्री प्राप्त प्रयोगशील शेतकरी सुभाष शर्मा यांचा मान्यवराच्या हस्ते राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने हृद्य नागरी सत्कार करण्यात आला. त्यानंतर आयबीएन लोकमतचे प्रतिनिधी भास्कर मेहेरे व दैनिक तरुण भारतचे प्रतिनिधी समीर मगरे यांना पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिवाय दैनिक लोकदूतचे अशोक गोडंबे, ग्रामीण पत्रकारीता पुरस्काराचे रामेश्वर पुदरवार, डॉ .अरविंद विश्वास, दैनिक हिंदुस्थानचे घाटंजी प्रतिनिधी राजुभाऊ चव्हाण, सचिन पत्रकार अनिल भाऊ गुंडेवार तसेच सामाजिक क्षेत्रातील व क्रीडा क्षेत्रातील विविध पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमातील प्रमुख वक्ते प्राध्यापक अंकुश वाकडे सर आणि विजय गायकवाड या दोन्ही संपादकांनी पत्रकारांच्या संदर्भाने यथोचित विचार मांडले ‌.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे पदाधिकारी पद्माकर घायवन यांनी केले तर उत्कृष्ट संचालन सौ शुभांगी ठाकरे व आभार राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे बाभुळगाव तालुकाध्यक्ष संघपाल खंडेराव यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संतोष डोमाळे, अरुण देशमुख, विलास कळसकर, अशोक उमरकर, अब्दुल रफिक, विशाल कुमार राऊत, जरार खान, रामेश्वर पुदरवार, राहुल ढळे, मुदस्सर शेख, राजू सोनवणे, अनिल चौरे, बुद्धीजम तेलंग, आनंद नक्षणे, रवी जयस्वाल, निखिल गिरी, संदेश तुपसुंदरे, संजय निंदेकर, कैलास भगत, कल्पना मुनेश्वर, वंदना देशमुख, नेहा बागडे, निकिता मरसकोल्हे, सय्यद सलीम, राहुल वसाके, प्रवीण राठोड, दशरथ मेश्राम, रुस्तम शेख, वीरेंद्र पाईकराव, आदींनी अथक परिश्र
म घेतले.