
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
कृषि कार्यानुभवकार्याक्रम २०२२अंतर्गत मारोतराव वादाफळे कृषि महाविद्यालय यवतमाळ येथील विद्यार्थी सुमेध सुरेशराव भोयर, चैतन्य नरसिंग राठोड,प्रणय साहेबराव मून, वैभव रवींद्र गावंडे . यांनी शेतकऱ्यांना फायदेशीर कीटक आणि हानिकारक कीटक त्या बद्दल माहिती दिली. त फायदेशीर कीटक मधमाशी , फुलपाखरू, लाख कीटक, रेशीम किडा यांचे महत्व सांगण्यात आले व हानिकरक कीटक पिकांना कश्या प्रकारे हानी पोहचवतात याबद्दल विध्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली. हा उपक्रम प्राचार्य डॉ. आर. ए. ठाकरे, उपप्राचार्य एम. व्ही. कडू, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. व्हि. महानूर, विषय तज्ञा एस. टी. भोयर या सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
