शिकारीला गेलेल्या ३० वर्षीय तरुणांचा करंट लागून मृत्यू


सहसंपादक : रामभाऊ भोयर

वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या एकुर्ली येथील हनुमान सुरेश वागदरे हा दिं १८ ऑगष्ट २०२४ रविवारच्या रात्रीला शेतात शिकारीला गेला असता उमरेड येथील राजू अजाब परचाके यांच्या शेताभोवताल जनावरांच्या बंदोबस्ता करिता विद्युत करंट लावला असताना हनुमान शिकारीला गेला असता हनुमान च्या पायाला करंट लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

सविस्तर वृत्त असे की हनुमान ची पत्नी शितल हिने हनुमानला रक्षा बंधनला माहेरी वाडीपुर, ता. केळापुर येथे जाण्यासाठी पैसे मागीतले असता त्याने माझ्याकडे पैसे नाहीत असे म्हणून ते गुलेर घेवुन शिकारीला ९:३० वाजताच्या दरम्यान निघुन गेला ही माहिती हनुमान ची पत्नी हिने हनुमानाच्या भावजवळ सांगितली तेव्हा हनुमानाचा भाऊ हनुमानला शोधण्यासाठी पिंपळापुर पांदन रस्त्याने गेलो तेव्हा त्याने मला पाहीले आणि तो जोरात समोर पळत गेला होता. माझ्‌याकडे मोठी बॅटरी नसल्याने मी त्याच्या मागे जावुन त्याला शोधले नाही. त्यानंतर मी घरी येवुन झोपुन गेलो होतो.
दुसऱ्या दिवशी सकाळी ६:३० वा.चे सुमारास मी झोपेतुन उठलो तेव्हा रात्री शिकारीला गेलेला माझा मोठा भाऊ हनुमान सुरेश वागदरे, वय ३० वर्ष हा मला घरी आलेला दिसला नाही. म्हणुन मी माझी आई विमल आणि वहीनी शितल अशांना भाऊ हनुमान बाबत विचारपुस केली असता त्यांनी तो रात्रभर घरी आलाच नाही असे सांगितले होते. रात्र जावुन पण भाऊ हनुमान घरी आला नाही. म्हणुन मला त्याची काळजी वाटु लागल्याने मी, गावातील वसंता आत्राम, अंकुश मेटकर, किसन मेटकर अशांना सोबत घेवुन काल रात्री तो शिकारीसाठी ज्या दिशेने गेला त्या दिशेने जावुन त्याचा शोध घेत असतांना सकाळी ८:०० वाजताच्या सुमारास उमरेड शिवारातील रामु अजाब परचाके यांचे गुराचे गोठ्या जवळ तिन ते चार लोक उभे होते व ते आप-आपसात काहीतरी बोलत होते. म्हणुन आम्ही त्यांच्या जवळ जावुन त्यांना रात्री इकडे कोणी माणुस आला होता का ? असे त्यांना विचारले असता शेत मालक रामु अजब परचाके यांनी आम्हाला सांगितले की, माझ्या शेत गट नं. 69/1 च्या खालच्या शेत बांधावर एक माणुस पडुन आहे. असे त्यांनी आम्हाला सांगितल्याने आम्ही सर्वांनी त्या शेताचे बांधावर जावुन पाहीले असता त्या ठिकाणी माझा मोठा भाऊ हनुमान सुरेश वागदरे हा उताने स्तितीत पडुन होता. या बाबतची माहिती पोलीसांना दिली असता पोलीसानी पंचनामा मृतदेह ग्रामीण राळेगाव येथे शवविच्छेदन करिता पाठविण्यात आला असून पुढील तपास वडकी पोलीस करीत आहे