राष्ट्रानेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा निमित्य विद्यार्थाना मार्गदर्शन,सहाय्यक आयुक्त समाज कल्याण भाऊराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती

तालुका प्रतिनिधी, झरी:–२२ सप्टेंबर रोजी मातोश्री पुनकाबाई विजाभज प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळ मुकूटबन शाळेला सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यवतमाळ .भाऊराव चव्हाण यांनी भेट दिली. आश्रमशाळेतील सोयी सुविधा व परिसराची पाहणी केली. वसतिगृहातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नुकत्याच चालू असलेल्या राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा निमित्य सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमध्ये सेवा भावाची जाणीव निर्माण करून महात्मा गांधी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला तसेच शाहू फुले, आंबेडकर यांची विचारधारा विद्यार्थ्यांना समजावून सदर कार्यक्रमास संस्थेचे मानद सचिव . गणेश उदकवार, संचालक संकेत उदकवार, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वसतिगृह कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचलन विपीन वडके यांनी तर आभार प्रदर्शन गजानन गद्दलवार यांनी केले.