
सहसंपादक : रामभाऊ भोयर
यवतमाळ:हातनी (ता. दारव्हा, जि. यवतमाळ) येथे देशभरातील गोर बांधवांचा भव्य संगम
गोर समाजाच्या ऐक्य, परंपरा आणि संस्कृतीचा वारसा जपणारा राष्ट्रीय स्तरावरील भव्य ‘गोर मळाव / मलांळ मांडेर कार्या’ यावर्षी २४ व २५ नोव्हेंबर २०२५ रोजी महाराष्ट्रातील हातनी – माळेगाव रोड, ता. दारव्हा, जि. यवतमाळ येथे उत्साहात पार पडणार आहे.
२०१८ मध्ये पारंपरिक पद्धतीने सुरू झालेल्या या मळावाचे आयोजन आतापर्यंत तेलंगणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश आदी राज्यांत यशस्वीरीत्या पार पडले असून, मागील वर्षी संगारेडी (तेलंगणा) येथे हा मळाव झाला होता. यावर्षी महाराष्ट्राला या ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन करण्याचा मान लाभला आहे.
या दोन दिवसीय मळावात देशभरातील हजारो गोर बांधव सहभागी होणार असून, समाजाचा इतिहास, परंपरा आणि काशिनाथ नायकांसह समाजनायकांचे कार्य यांचे स्मरण केले जाणार आहे.
लाखा गोर, जंगी भंगी, मिटू भुकीया, सोमा साद, थानू नायक, लोका–भिमा नायक, इसरा इसळावत, हतीराम बापू, भोजा मसंद, लिंगा मसंद आदी समाजनायकांचे योगदानही विशेष अधोरेखित केले जाईल.
प्रमुख कार्यक्रम
२४ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता पारंपरिक ‘जळ-भोग ’ विधीने मळावाचा शुभारंभ
दोन्ही दिवस सतगुरू सेवालाल महाराजांचे भोग-भंडार
पारंपरिक कला, नृत्य आणि लोकसंस्कृतीचे विशेष सादरीकरण
आवाहन :
गोरसेना राष्ट्रीय अध्यक्ष मा. संदेश भाऊ चव्हाण, गोरसिकवाडी नांदेड जिल्हा संयोजक रामराव राठोड, गोरसेना नांदेड जिल्हा अध्यक्ष अतुल राठोड, तसेच किनवट तालुकाध्यक्ष प्रदीप राठोड यांनी सर्व गोर बांधव व भगिनींना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
गोर समाजाच्या ST आरक्षणाच्या मागणीसाठी एकजुटीने उपस्थित राहणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
हातनी हे ठिकाण दारव्हा पासून सुमारे ८ कि.मी. व दिग्रसपासून साखरा मार्गे ७ कि.मी. अंतरावर आहे.
हा मळाव गोर समाजाच्या ओळखीचा, सांस्कृतिक परंपरेचा आणि ऐक्याचा भव्य संगम ठरणार असून, महाराष्ट्राच्या भूमीवर इतिहास घडविणारा ठरेल, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
