
वरोरा तालुक्यातील डोंगरगाव रेल्वे येथील मालमत्ता क्र.117/2 ही जागा 2001 पर्यंत अशोक बोरा यांच्या नावावर असल्याची नोंद ग्राम पंचायत डोंगरगाव ला असताना देखील चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीर रित्या ती मालमता 2001 :2002 मध्ये चंद्रभान घुगल यांच्या नावाने करण्यात आली आहे .
झालेल्या फेरफार बद्दल माहिती मागितली असता ग्राम पंचायत डोंगरगाव यांच्याकडे या फेरफार बद्दलची कोणतीही माहिती नसल्याचे सांगण्यात आले.त्याच आधारावर आपला हेतू साध्य करण्यासाठी तत्कालीन अधिकाऱ्याने केलेला फेरफार रद्द करण्यात यावा यासाठी एम आय एम चे तालुकाध्यक्ष मुज्जमिल शेख यांनी निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी वरोरा यांना फेरफार रद्द करत संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची विनंती केली आहे.
चुकीच्या कामांना आम्ही आधार देणार नाही .चुकीच्या कामावर कारवाई होत नसेल तर गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयात तीव्र आंदोलन करू:
मुज्जमिल शेख
तालुकाध्यक्ष
एम आय एम
