
प्रतिनिधी:सुमित चाटाळे,पहापळ
पहापळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात कारगिल विजय दिनानिमित्त काँग्रेस तर्फे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते..
२६ जुलै आपणा सर्व भारतीयांकरिता गौरवाचा दिवस आहे. “कारगिल विजय दिवस” म्हणून आपण हा दिवस साजरा करतो. १९९९ ला याच दिवशी आपल्या वीर जवानांनी शत्रूंचा पराभव करुन कारगिल येथे भारताचा तिरंगा ध्वज फडकवला होता. कारगील युद्धात सहभागी होऊन अतुलनीय शौर्य दाखवीणाऱ्या प्रेरणादायी वीर सैनिकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता २६ जुलै (कारगील विजय दिवस) ते १५ ऑगस्ट (स्वतंत्रता दिवस) पर्यंत मा. शिवाजीराव मोघे साहेब यांच्या नेतृत्वात आर्णी – केळापूर विधानसभा मतदारसंघातील एकुण १४ ठिकाणी काँग्रेस पक्षातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .
दिनांक.२६/०७/२०२१कार्यक्रमाचे उद्घाटक माजी सैनिक सुनील देशट्टीवार यांचा हस्ते संपन्न झाले कार्यक्रमाचे अध्यक्ष जितेंद्र शिवाजीराव मोघे प्रमुख पाहुणे जि. प. सदस्य सुचारिता पाटिल, विजय पाटील , अमर पाटिल तालुकाध्यक्ष काँग्रेस , मनोज भोयर, शहराध्यक्ष कांग्रेस, इकराम अली आनी समाजिक कार्यकर्ते अविकुमार पाटिल , धनराज चव्हाण उपसरपंच दहेली गजानन कासडवार, विपिल चिंतावर ,समीर चंदरने, स्वप्निल गौरवार व प्राथमिक आरोग्य केंद्र पहापळ येथील वैद्यकिय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
