अवैधरेती वाहतूक करणाऱ्याने महिला कोतवालाला दिली जिवे मारण्याची धमकी

राळेगाव तालुक्यातील घटना

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

अवैध रेतीची तस्करी करणारा ट्रॅक्टर मालकाने महिला कोतवाल कर्मचारी सौ. छाया दरोडे यांच्या घरी जाऊन कंपाउंड भिंतीच्या गेटवर दुचाकी नेवून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना राळेगाव तालुक्यातील येवती येते घडली. अवैध वाळू तस्कर विकास पुंडलिक सेवेकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत निमसटकर यांनी वडकी पोलीस ठाण्यात निवेदन देवून मागणी केली कारवाई न झाल्यास १८मे रोजी पासून महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना बेमुदत संपावर जाईल असा इशारा दिला. यावेळी उपस्थित कोतवाल कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.