सराटी गावातील पथदिवे दिर्घ काळा पासून बंद चं…

राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

ग्रामपंचायत सराटी च्या दुर्लक्षित धोरणामुळे म्हणा की कामचुकारपणा म्हणा गावातील पथदिवे दिर्घ काळा पासून बंद चं असून, रात्रीच्या अंधाराचे साम्राज्य कधी संपणार याचीच वाट गावकरी पाहत आहे.विशेष म्हणजे सराटी हे गाव जंगल सीमेला लागून असल्यामुळे रानटी श्वापदे केव्हा हल्ला,रात्री च्या अंधारात करेल याचा नेम नाही. 
त्यामुळे ग्रामपंचायत सराटी कार्यालयाने रात्री उजेड पाडावा अशी मागणी गावकऱ्यांची आहे.