
सहसंपादक: रामभाऊ भोयर
प्रहार संघटनेची वेगळी ओळख सागांवी अशी गरज नाही याच संघटनेत प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या विचाराने प्रेरीत होऊन संजय दुरबुडे यांनी पंधरावर्षा पूर्वी प्रहार संघटनेत प्रवेश केला आ बच्चू कडू यांनी त्यांच्यावर राळेगाव तालुका अध्यक्षाची जबाबदारी सोपवीली तालुक्यातील अपंग असो रक्तदान शिबीराचे आयोजन आरोग्य शिबीराचे आयोजन निराधाराची कामे सर्वसामान्य मानसाची कामे निस्वार्थी पणे करून त्यांनी आ बच्चू कडू यांचा विस्वास संपादन केला प्रहार संघटनेच्या अनेक आंदोलनात आ बच्चू कडू यांच्या सोबत सहभाग घेणारा सक्रीय कार्यकर्ता म्हणून त्यांची प्रहारमध्ये ओळख आहे . या कामाची पावती म्हणून त्यांची चार वर्षा पूर्वी जिल्हा उपाध्यक्ष पदावर वर्णी लागली होती परंतु जिह्यात जास्त ते रमले नाही त्या काळात त्यांनी कळंब बाभुळगाव राळेगाव तालुक्यात प्रहारची मोट चांगली बांधली होती . मागील लोकसभेला प्रहार संघटना ऐवजी प्रहार जनशक्ती पक्ष असे नामकरण झाले आणि यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघातून श्रीमती येडे ह्या विधवेस (आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्या ची पत्नी ) राजूर ता कळंब ह्यांना उमेदवार म्हणून लढविले राळेगांव मतदार संघाची त्या वेळेस आ बच्चू कडूनी जबाबदारी संजय दुरबुडे यांच्या कडे सोपविली होती . प्रहार संघटनेत प्रवेश करण्या पूर्वी पत्रकार संघटेने चे सचिव , राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुका सरचिटणीस समता परीषदेचे तालुका अध्यक्ष संजय गांधी निराधार अशासकीय सदस्य रुग्ण कल्याण समितीचे सदस्य म्हणून काम पाहीले आहे . त्यांची पुन्हा प्रहारजनशक्ती पक्षाच्या तालुका अध्यक्ष म्हणून जिल्हा अध्यक्ष नितीन मिर्झापूरे यांनी फेरनिवड केली आहे संजय दुरबुडे यांनी आमदार बच्चुभाऊ कडू बल्लुभाउ जंवजाळ नितीन मिर्झापूरे यांचे आभार मानले आहे . त्याच्या य निवडी बद्दल माजी प्रा अशोक पिंपरे मंगेश राऊत (नगर सेवक ) राजू रोहणकर नितीन कोमेरवार दिलीप कन्नाके प्रविण काकडे बबलू बहाळे ॲड मंगेश बोबडे , ॲड मांडवकर नितीन कोरडे प्रफुल खेलपांडे शेखर आंबाखाचे किशोर झाडे नानाजी कोवे गणेश कुडमथे भानुदास आत्राम सैय्यद लियाकत अली बादशाह भाई शुभम चिडाम लोकेश गायकवाड प्रतिक भोगांडे फैजल शेख मोनू अकरम खान चेतन बेंबारे लोकेश बेंबारे राहूल वर्मा यांनी अभिनंदन केले आहे .
