प्रतिनिधी ..नितेश ताजणे वणी
वणीतील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर महेंद्र लोढा यांच्या विरोधात आणखी एक तक्रार वणी पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली आहे. चुकीच्या निष्काळजी व हलवणीतील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर महेंद्र लोढा यांच्या विरोधात आणखी एक तक्रार वणी पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली आहे. चुकीच्या निष्काळजी व हलगर्जीपणामुळे मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास झाल्याचा आरोप येथिल शासकीय विश्रामगृहात दिनांक ७ ऑगस्ट २०२३ ला दुपारी ४ वाजता घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून केला आहे. विशेष म्हणजे दि.१ ऑगस्ट रोजी डॉ महेंद्र लोढा यांच्या विरोधात अश्याच प्रकारची एक तक्रार नवजात बाळाच्या वडीलाने वणी पोलीसात दिलेली आहे त्यामुळे आणखी असे किती प्रकरण समोर येइल? अशी चर्चा सुरू झाली आहे.
तक्रारदार मनोहर रघुनाथ मुके रा. आवारी ले आऊट वणी यांनी पोलीस स्टेशन वणी येथे दि.७ ऑगस्ट २०२३ ला दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक २७/९/ २०२२ पासून त्यांची सुन वैशाली महेश मुके हि दोन महिन्याची गर्भवती असताना डॉ महेंद्र लोढा यांच्याकडे उपचार सुरू केला.
त्यानंतर तक्रारदार यांची सुन वैशाली हि तिन महिन्याची गर्भवती असताना डॉ. महेद्र लोढा यांच्या खासगी रुग्णालयात सोनोग्राफी केली तेव्हा बाळ निरोगी व सुखरुप आहे चिंता करण्याची आवश्यकता नाही असे सांगितले होते मात्र ३ डी सोनोग्राफी करायला सांगितले नव्हते असे त्यांचे म्हणणे आहे.
त्यानंतर २१ नोव्हेंबर २०२२ ला फेरतपासणी केली. त्यानंतर पुन्हा दिनांक २३ जानेवारी २०२३ रोजी सोनोग्राफी काढली तेव्हा देखील बाळ सुदृढ आहे निरोगी आहे असे सांगितले. त्यानंतर दिनांक ९ एप्रिल २०२३ ला नवव्या महिन्याची सोनोग्राफी काढली तेव्हा देखील सांगितले की बाळ सुखरूप व निरोगी आहे. त्यानंतर सुनेचे नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर तिला दि. १३ मे २०२३ रोजी प्रसुती करिता ग्रामीण रुग्णालय वणी येथे नेले त्याच दिवशी दुपारी ४:४१ वाजता प्रसुती झाली. बाळाचा जन्म झाला मात्र नवजात बाळाच्या उजव्या पायाच्या मांडीचे हाड खुपच लहान असल्याचे दिसून आल्याने डॉ महेंद्र लोढा कडुन आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. कारण बाळाला अपंगत्व असल्याचे दिसून आले. तिसऱ्या, सहाव्या व नवव्या महिन्याची सोनोग्राफी केली तेव्हा डॉ लोढा यांनी सदरची बाब का लपवून ठेवली? त्यांनी आमची फसवणूक केली असे तक्रारदार मनोहर रघुनाथ मुके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले
त्यानंतर तक्रारदार बाळाला घेऊन चक्क डॉ महेंद्र लोढा यांच्या रुग्णालयात गेले तेव्हा डॉ लोढा यांनी समाधानकारक उत्तर न देता निघून जाण्यास सांगितले त्यामुळे डॉ महेंद्र लोढा यांच्यावर कारवाई करुन न्याय देण्याची मागणी केली आहे.
पत्रकार परिषदेत बाळाची आई, आजी, आजोबा काका व परिवारातील सदस्य उपस्थित होते.गर्जीपणामुळे मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास झाल्याचा आरोप येथिल शासकीय विश्रामगृहात दिनांक ७ ऑगस्ट २०२३ ला दुपारी ४ वाजता घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून केला आहे. विशेष म्हणजे दि.१ ऑगस्ट रोजी डॉ महेंद्र लोढा यांच्या विरोधात अश्याच प्रकारची एक तक्रार नवजात बाळाच्या वडीलाने वणी पोलीसात दिलेली आहे त्यामुळे आणखी असे किती प्रकरण समोर येइल? अशी चर्चा सुरू झाली आहे.
तक्रारदार मनोहर रघुनाथ मुके रा. आवारी ले आऊट वणी यांनी पोलीस स्टेशन वणी येथे दि.७ ऑगस्ट २०२३ ला दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक २७/९/ २०२२ पासून त्यांची सुन वैशाली महेश मुके हि दोन महिन्याची गर्भवती असताना डॉ महेंद्र लोढा यांच्याकडे उपचार सुरू केला.
त्यानंतर तक्रारदार यांची सुन वैशाली हि तिन महिन्याची गर्भवती असताना डॉ. महेद्र लोढा यांच्या खासगी रुग्णालयात सोनोग्राफी केली तेव्हा बाळ निरोगी व सुखरुप आहे चिंता करण्याची आवश्यकता नाही असे सांगितले होते मात्र ३ डी सोनोग्राफी करायला सांगितले नव्हते असे त्यांचे म्हणणे आहे.
त्यानंतर २१ नोव्हेंबर २०२२ ला फेरतपासणी केली. त्यानंतर पुन्हा दिनांक २३ जानेवारी २०२३ रोजी सोनोग्राफी काढली तेव्हा देखील बाळ सुदृढ आहे निरोगी आहे असे सांगितले. त्यानंतर दिनांक ९ एप्रिल २०२३ ला नवव्या महिन्याची सोनोग्राफी काढली तेव्हा देखील सांगितले की बाळ सुखरूप व निरोगी आहे. त्यानंतर सुनेचे नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर तिला दि. १३ मे २०२३ रोजी प्रसुती करिता ग्रामीण रुग्णालय वणी येथे नेले त्याच दिवशी दुपारी ४:४१ वाजता प्रसुती झाली. बाळाचा जन्म झाला मात्र नवजात बाळाच्या उजव्या पायाच्या मांडीचे हाड खुपच लहान असल्याचे दिसून आल्याने डॉ महेंद्र लोढा कडुन आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. कारण बाळाला अपंगत्व असल्याचे दिसून आले. तिसऱ्या, सहाव्या व नवव्या महिन्याची सोनोग्राफी केली तेव्हा डॉ लोढा यांनी सदरची बाब का लपवून ठेवली? त्यांनी आमची फसवणूक केली असे तक्रारदार मनोहर रघुनाथ मुके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले
त्यानंतर तक्रारदार बाळाला घेऊन चक्क डॉ महेंद्र लोढा यांच्या रुग्णालयात गेले तेव्हा डॉ लोढा यांनी समाधानकारक उत्तर न देता निघून जाण्यास सांगितले त्यामुळे डॉ महेंद्र लोढा यांच्यावर कारवाई करुन न्याय देण्याची मागणी केली आहे.
पत्रकार परिषदेत बाळाची आई, आजी, आजोबा काका व परिवारातील सदस्य उपस्थित होते.