कारने धडक दिल्याने वयोवृद्ध इसम जागीच ठार

राळेगांव ते वडकी रोडवरील सावनेर येथील घटना.

राळेगांव पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सावनेर येथील शत्रूघन कुमरे वय वर्षे 70 हे काल जनावरांना चारा आणण्यासाठी गेले होते . राळेगांव वरून गडचांदूर येथे जाणाऱ्या झायलो गाडी क्रमांक mh 34 av 9630 याचे गाडीवरून नियंत्रण सुटल्याने इसमाला जोराने धडक देऊन शत्रूघन कुमरे हा जागीच ठार झाला. हि धडक बसताच मृतक विस फुट दुर फेकल्या गेले . घटनेची माहिती मिळताच गावातील सागर नेहारे , विठ्ठल शेंडे, सतिश कुमरे, यांनी घटनास्थळी जाऊन जखमीला राळेगांव ग्रामीण रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले. राळेगांव पोलिसांनी अपघातातील गाडी पोलिस ठाण्यात जमा करून चालका विरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला तसेच पुढील तपास राळेगांव पोलिस करीत आहे.