
लोकहीत महाराष्ट्र उमरखेड
तालुका प्रतिनिधी: संदीप जाधव
आज सकाळी विभक्त राहणाऱ्या पतीकडून पत्नीची चाकूने गळा चिरून हत्या झाल्याची घटना घडली, घटनेने शहरात खळबळ उडाली आहे, सर्वत्र या घटनेची चर्चा सुरू आहे, प्राप्त माहितीनुसार शहरात राहणारी कविता शिवाजी नारमवाड वय अंदाजे २८ वर्षे ही आपल्या माहेरी आई व मुलासोबत पतीपासून विभक्त राहत होती आपल्या स्वतःच्या पाल्याचे पालन पोषण इतरांकडे काम करून करत असे,१२ वर्षांपूर्वी तिचे लग्न भोकर तालुक्यातील चिंचाळा गावातील शिवाजी नारमवाड यांच्याशी झाले होते, पतीपत्नीच्या वादविवादामुळे ती आपल्या माहेरी येऊन राहिली होती, घटनेच्या दिवशी आरोपी पती शिवाजी नारमवाड आपल्या पत्नीला भेटण्यासाठी आला होता अशी माहिती शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी दिली, रात्री जेवण करून झोपेतच पती शिवाजीने मृतक कविताच्या गळ्यावर चाकूने सपासप वार केले होते, जखमी कविता रात्री ३ वाजता मदतीसाठी आरडाओरडा करत बाहेर येऊन रस्त्यावर पडली होती,आरडाओरडीमुळे शेजारी राहणारे नागरिक झोपेतून उठले तर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली कविता त्यांना दिसली, लगेच सरकारी दवाखान्यात नेण्यात आले होते, परंतु जखमी अवस्थेत तिला तपासताना तिचा मृत्यू झाला,घटनेनंतर पुढील तपास बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुजाता बनसोड व बीट जमादार मोहन चाटे साहेब हे करत आहेत…
