तहसील कार्यालय समोर सुरू असलेल्या उपोषणाची आ.प्रा उईके यांनी केली सांगता

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर


तालुक्यातील वडकी सर्कल मधील नागरिकांनी आपल्या न्याय व हक्कासंबंधी विविध मागण्या पूर्ण करण्याकरिता दिं ६ फेब्रुवारी २०२३ रोज सोमवार पासून तहसील कार्यालय येथे आमरण उपोषण सुरू केले होते.या उपोषणाचा आज दिं ९ फेब्रुवारी २०२३ रोज गुरवार चौथा दिवस होता यावेळी आमदार अशोक उईके यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन उईके यांच्या उपस्थितीत उपोषणाची सांगता करण्यात आली. यावेळी उपोषणकर्त्यांच्या मागण्या संदर्भात आज दि ९ जानेवारी २०२३ रोजी राळेगाव विधानसभेचे आमदार प्रा डॉ अशोक उईके,तहसीलदार रवींद्र कांनडजे,शिवसेनेचे तालुका प्रमुख मनोज भोयर,भाजपा तालुकाध्यक्ष चित्तरांजनदादा कोल्हे,प्रफुलसिंह चौहान,डॉ कुणाल भोयर,प्रशांत तायडे,सौ विद्याताई लाड यांनी उपोषणकर्त्यांचा मागण्यांवर सविस्तर चर्चा करून लवकर तोडगा काढून न्याय दिला जाईल,व जे काही रास्त मागण्या आहे त्यावर लेखी आश्वासन दिले व उपोषणकर्त्यांना शरबत पाजून या उपोषणाची सांगता करण्यात आली आहे.