श्री राम जन्मोत्सव समिती वणी द्वारा भव्य नेत्रचिकीत्सा शिबीर व रक्तदान शिबीराचे आयोजन

श्री राम जन्मोत्सव समिती वणी द्वारा भव्य नेत्रचिकीत्सा शिबीर व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. कस्तुरबा हॉस्पीटल सेवाग्राम येथील नेत्रतज्ञांच्या चमुच्या माध्यमातून नेत्रचिकीत्सा करण्यात येणार आहे. या नेत्रचिकीत्सा शिबीरात जे नेत्ररुग्ण तपासणी अंती चष्म्यांसाठी पात्र ठरतील त्यांना मोफत चष्मे, औषधी व आय ड्रॉप समिती तर्फे वितरीत करण्यात येईल. तसेच जे मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरतील त्यांच्यावर कस्तुरबा हॉस्पीटल सेवाग्राम येथे मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येईल.

त्याचप्रमाणे प्रविण साठवने मॅनेजर, लाईफ लाईन ब्लड बँक नागपूर यांच्या सहयोगाने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यांत येत आहे. सर्व रुग्णांकरीता व रक्तदात्यां करीता अल्पोपहाराची व्यवस्था समिती तर्फे करण्यात आली आहे. श्री राम जन्मोत्सव समिती वणी द्वारा आयोजीत या उपक्रमाचा अर्थात नेत्रचिकीत्सा शिबीराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा, व रक्तदान शिबीरात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन समितीच्या वतीने विजय चोरडिया,अजिंक्य शेंडे, अरुण कावडकर, श्याम भडगरे,कैलास बिलोरिया, महाविर कटारिया यांनी केले आहे.