
प्रतिनिधी,प्रवीण जोशी.
ढाणकी.
शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता टिकवायची असल्यास पारंपारिक पिकाला छेद देत बदल करण्याची गरज आहे. तरच आजच्या महागाईच्या व नैसर्गिक संकटात शेतकरी धीरूदत्त उभा राहील सर्वसाधारणपणे कसदार काळ्या व सखल पाणी साचणाऱ्या पोयटायुक्त जमिनीमध्ये फळ पिके यावे अशा प्रमाणात येत नाही. पण साधारणपणे मुरमाड जमिनीमध्ये फळवर्गीय पीक अतिशय उत्कृष्ट पद्धतीने येते याचाच फायदा शेतकऱ्यांनी घ्यायला हवा याला अनुसरून भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना सुरू होती. पण राज्यात कोरोना आणि सरकारची अंतर्गत बंडाळी मुळे ही योजना बंद पडली होती. पण स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर योजना शिंदे सरकारने येताच ती पुन्हा सुरू केली असून सन 2022_ 23 या वर्षात उमरखेड तालुक्यातील इच्छुक व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत फळबाग योजनेचे लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी उमरखेड यांनी केलेली आहे. या योजने करता कमीत कमी 0:20 क्षेत्रफळ असायला हवे तर जास्तीत जास्त क्षेत्रफळ 06:०० हेक्टर असणे अभिप्रेत आहे. तसेच लाभ किती घ्यायचा क्षेत्रफळाचा हे सर्वस्वी शेतकऱ्यावर अवलंबून आहे. व त्यानुसार त्यांना फळपीक लागवड करता येईल तसेच या योजनेअंतर्गत दीर्घकाळ फळ देणारी फळ पिक आंबा,पेरू डाळिंब, लिंबू, मोसंबी, संत्रा, सीताफळ, आवळा, चिंच, जांभूळ, चिकू, या दीर्घकाळ फलश्रुती देणाऱ्या वृक्षांचा सुद्धा समावेश केलेला आहे.
मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवड योजनेतून काही तांत्रिक कारणास्तव अपात्र राहिलेल्या अशा शेतकऱ्यांना सुद्धा वैयक्तिकरित्या लाभ घेता येईल तसेच शेतकऱ्यांनी स्वमालकी हक्काचा शेताचा सातबारा व गाव नमुना आठ उतारा असणे आवश्यक असून ज्या फळबागा लागवड करू इच्छित असणाऱ्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी संकेतस्थळावर फलोउत्पादन या बाबी अंतर्गत नोंदणी करावी. तसेच या योजनेअंतर्गत अनुदान मंजूर नियमाप्रमाणे देय अभिप्रेत असल्यामुळे अर्ज करताना संबंधित शेतकऱ्यांनी सातबारा व आठ नुसार क्षेत्रफळ, सर्वे क्रमांक जे फळपीक घ्यावयाचे आहे त्याचा प्रकार कलमे, रोप ज्या पद्धतीने अंतर लागवड करायची असेल मीटरमध्ये अशी माहिती त्यात भरल्या जाईल आणि हे सर्व बारकाईने वाचून घ्यावी. व महाडीबीटी पोर्टल सुरू झाल्यापासून या योजनेअंतर्गत प्राप्त होणारे अर्ज आर्थिक ध्येयानुसार किंवा मर्यादेला अधीन राहून अत्याधुनिक संगणकीय सोडती द्वारा लाभार्थ्याची निवड करण्यात येणार आहे. या योजनेची सर्वबाबी वेबसाईटवर उपलब्ध आहे तसेच अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा असे आव्हान तालुका कृषी अधिकारी, बळवंतकर साहेब यांनी केले आहे.
