श्री साई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

आज ५ सप्टेंबर डाँ .सर्वपल्ली राधाकृष्णन जयंतीनिमीत्त संपुर्ण देशभर शिक्षक दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. श्री साई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. सर्वप्रथम डाँ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची प्रतिमा भेट देत त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.आज दिवस भर ज्या विद्यार्थांनी शिक्षक बनुन विद्यार्थिना अध्यायनाचे काम केले त्या सर्व विद्यार्थांचे सत्कार करुन त्याची मनोगते व्यक्त करुन शिक्षण आणि शिक्षकाबद्दलची भावना आपल्या शब्दात व्यक्त केली.तसेच शिक्षक दिना निमीत्त सर्व शिक्षकांना फुलांचा गुलदस्ता भेट देत त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी जे शिक्षक आपल्या राष्टाची आदर्श भावी पिढी घडण्याचे काम करत असताना आपल्यातील सर्वष्ट गुणाची पराकाष्टा करून तन मन धनाने अविरत प्रयत्न करतात अशा शिक्षकाप्रती कुतज्ञता म्हणून शिक्षक दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या वेळी श्री साई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉंलॉजी कॉलेज च्या
इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट चे HOD बोंडे सर , बावणे मॅडम , आचल मॅडम डिंपल मॅडम, प्रांजली मॅडम यांना शाहरूखखान पठाण , चैतन्य झाडे यांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या . विद्यार्थि तसेच पालक वर्ग उपस्थित होते.