
सौ. शर्मिला राजसाहेब ठाकरे महिला सन्मान योजनेच्या माध्यमातून अमरावती विभागासह वाशीम जिल्हयात महिला बचत गटांचा आर्थिक विकास साधणार – प्रा. संगिता चव्हाण
वाशीम – जिल्ह्यात राबविण्यात येणार्या सौ. शर्मिला राजसाहेब ठाकरे महिला सन्मान योजना पत्रकाचे बुधवार, २ ऑगष्ट रोजी मुंबई येथे शिवतीर्थ कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अर्धांगिनी सौ. शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. वाशीम जिल्हयातील बचत गटांच्या आर्थिक विकासासाठी ही योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती मनसे जनहित कक्षाच्या राज्य उपाध्यक्षा प्रा. संगिता चव्हाण यांनी दिली. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष मनिष डांगे, मालेगाव तालुका संघटक महेश देशपांडे, सौ. पुष्पा रौंदळे, सौ. वनिता पांडे आदी उपस्थित होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आर्शिवादाने, जनहित व विधी विभागाचे राज्य अध्यक्ष किशोर शिंदे, सरचिटणीस महेश जोशी यांच्या मार्गदर्शनात व जनहितच्या राज्य उपाध्यक्ष प्रा. संगीता चव्हाण यांच्या संकल्पनेतून तसेच जिल्हा संपर्क नेते विठ्ठल लोखंडकर, जिल्हाध्यक्ष मनीष डांगे, विधी सेलचे जिल्हाध्यक्ष अँड. नामदेव जुमडे यांच्या सहकार्याने ही योजना वाशिम जिल्हा व अमरावती विभागात राबविण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण व महिला बचत गटांना अनुदान वितरण, बचत गटाचे प्रदर्शन, रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबिर, बचत गट स्थापन करणे आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
