हिमायतनगर तालुक्यातील कामारी व विरसनी परिसरातून अवैध रेतीचे उत्खनन सुरूच..! महसूलचे तलाठी व मंडळ अधिकारी गप्प का ? तहसीलदार यांनी लक्ष देण्याची मागणी हिमायतनगर तलाठ्याची रेती माफिया वर दुसरी धडाकेबाज कारवाई.

हिमायतनगर प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी


तालुक्यातील मौजे कामारी विरसनी , पिंपरी, घारापुर , सह पळसपुर परिसरातून रात्रीला अवैध रेतीचा बेसुमार उपसा होत आहे या बाबीकडे स्थानिक तलाठी व मंडळाधिकारी हे मूग गिळून गप्प का ? असा आरोप हिमायतनगर शहरातील नागरिकांनी तहसीलदार यांना विचारला आहे मागील कित्येक दिवसापासून शहरातील अवैध रेती माफिया महसूल प्रशासनाला चकमा देत रेतीचे अवैध उत्खनन करत होते याची माहिती ठेवून हिमायतनगर तहसीलचे तहसीलदार गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर तहसील चे नायब तहसिलदार सय्यद साहेब , सज्जाचे तलाठी पुणेकर साहेब व तलाठी मेतलवाड साहेब यांनी दी.29 जानेवारी रोजी सकाळी चार वाजता रेतीने भरलेले ट्रॅक्टर पकडून हिमायतनगर पोलिस स्थानकात लावले दोन दिवसात दोन धडाकेबाज कारवाया केल्या पण कामारी पिंपरी बोरी सह घारापुर परिसरातून होत असलेल्या रेतीचे उत्खनन राजरोस पणे सुरू आहे या बाबीकडे महसूल प्रशासन लक्ष का देत नाही ? अशी मागणी शहरा सह तालुक्यातील पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केली आहे

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू केली त्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. त्यातच रेती घाटांच्या लिलावाची प्रक्रिया सुध्दा ठप्प पडली होती. मात्र अताच कुठे नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता दिली त्यामुळे शहरातील अनेक जण प्रधानमंत्री आवास योजनेतील मंजूर झालेले घरकुल बांधकाम करत आहेत .पण सद्या तालुक्यातील कुठल्याच रेती घाटांचे लिलाव झाले नसल्यामुळे शासकीय, निमशासकीय आणि शहरातील घरकुल लाभार्थ्यांचे बांधकामे ठप्प पडली आहे. याचाच सर्वाधिक गैर फायदा घेत तालुक्यातील मौजे कामारी, विरसनी घारापूर, बोरी सह पळसपुर परिसरातून चोरट्या मार्गाने रोज वाळू नेत असताना अनेक नागरिक पाहताहेत अनेक वेळा येथील नागरिकांनी या संदर्भात महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना मोखिक तक्रारी सुद्धा केले असतानाही येथील अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत या भागातून रोज रात्री ला व सकाळी पहाटे 2 ते 5 वाजे वाजेपर्यंत वाळूची तस्करी होत असते याकडे हिमायतनगर येथील तहसीलदार यांचे साफ दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे या भागातील महसूल चे अधिकारी ह्या रेती माफियांना रेती उत्खनन करण्याची परवानगी देत आहेत असे परिसरातील नागरिक बोलत आहेत त्यामुळे या बाबीकडे तात्काळ नांदेड चे कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी मा. विपीन इटनकर साहेब यांनी लक्ष देऊन या वाळू माफियांच्या मुसक्या आवळाव्यां अशी मागणी तालुक्यातील पर्यावरण प्रेमी नागरिकांन मधून होत आहे