

लोकहित महाराष्ट्र उमरखेड
तालुका प्रतिनिधी: संदीप बी.जाधव
गावामध्ये गावाचा विकासासाठी प्रयत्न करत राहणारे विक्रम भाऊ राठोड यांच्यासारखा सरपंच गावाला आज पर्यंत लाभला नाही.
नाली पासून गावांमध्ये रस्ते, ठिकाणी पूल, मंदिराजवळ गट्टू बसून गावामध्ये सरकारी व्यायाम शाळा व घरकुले यांच्या सेवेतून लोकांना मिळाले, धडपड करून स्वखर्चाने, दिल्ली, मुंबई ,यवतमाळ ठिकठिकाणी फिरवून ही कामे आणलेत. शेतामध्ये विहीर, गाय बैलांसाठी गोठे, शेततळे, मच्छी बंधारे अशा तऱ्हेने गावाचा सर्वांगीण विकास करणारा सरपंच मेट येतील रहिवाशांना लाभले आहे. विक्रम भाऊ यांच्या विषयी लिहिलं तेवढं कमीच पडते. गावामध्ये वेगवेगळे विकास काम चालू आहे.त्यांच्या आशीर्वादाने गोरगरिबांना घरकुल मिळाले.
कुठे भांडण झाली लोकांच्या तोंडावर तर विक्रम भाऊच नाव असते, गावांमधील एकही भांडण पोलीस प्रकरण न बनता आपसी करून ते वाद मिटवतात आणि गावाचा वातावरण शितल करतात.
