
सहसंपादक : रामभाऊ भोयर
गावागावात अधिकृत दारूचे दुकाने नसली तरी सर्वच प्रकारचे दारू विकत मिळते त्यामुळे महिला तसेच गावकरी या अवैध दारू विक्रेत्यांमुळे त्रासले असून त्याला पर्याय म्हणून गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन दारूबंदी करण्यात यावी या आशयाचे निवेदन चिखली येथील वंचित बहुजन आघाडी तसेच महिला बचत गटाच्या वतीने दिं . १६ एप्रिल २०२५ रोज मंगळवार ला पोलीस स्टेशनला पोलीस देण्यात आले .
पूर्वी प्रतिष्ठित समजली जाणारी दारू राजा राजवाड्यांच्या काळात घेतली जायची अलीकडे तिचे प्रकार व पद्धती बदलत गेल्या आणि विशिष्ट ठिकाणी मिळणाऱ्या दारूचे अधिकृत दुकाने साधारण गावापर्यंत पोहोचली मात्र यामध्ये बदल झाला आणि तालुक्यातील प्रत्येक गाव खेड्यांमध्ये अवैध दारू विक्री राजरोसपणे सुरू झाल्याने भांडण तंटाचे प्रकार चोरीचे प्रकार वाढले मोठ्या व्यक्तीसह लहान मुले ही दारूच्या आहारी जात असल्याने याची झळ विशेष करून कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या महिलांना बसत आहे.
अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी यासाठी गावातील दारू विक्रेत्यांना आम्ही ग्रामस्थ व महिला बचत गट यांनी अनेकदा दारू विक्री बंद करण्याबाबत सुचना दिल्या परंतु अवैद्य दारू विक्रेते कुणाचेही ऐकण्याच्या मनस्थीतीत नाही ते गावामध्ये गुंडगिरी करून अवैद्य दारू विक्री करीत आहे व आमचे कुणीच काही वाकडं करू शकत नाही अशी भाषा वापरत असतात, आम्ही पोलीसांना हप्ते देतो, आम्ही कुणाच्याही बापाला घाबरत नाही, भित नाही, कुठे जायचे तिथे जा असे म्हणुन जोमाने अवैद्य दारू विक्री करीत आहे.
ही दारूची दुकाने बस स्टॉप जवळ असल्याने एस टी बस ने शाळेत जाणाऱ्या मुलींनाही या दारू विक्रेत्यांचा नाहक त्रास होत आहे. तसेच आमच्या गावामध्ये आजुबाजुच्या गावातुन लोक दारू पिण्याकरीता येत असतात आणि दारू पिऊन गावात अशांतता पसरवितात तेव्हा मौजा चिखली (व.) येथील सुरू असलेली अवैद्य दारू विक्री त्वरीत बंद करन्यात यावी अन्यथा नाईलाजास्तव आम्हा गावकऱ्यांना व बचत गटातील महिलांना आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागेल अशा आशयाचे निवेदन देण्यात आले असून निवेदन देतेवेळी लोकेश दिवे,स्वप्नील ठाकरे,साहिल वनकर,दुर्वेश उमाटे,क्षितिज घायवटे,आकाश वनकर,पवन वैरागडे,महेश पाटील, गजानन मेश्राम,प्रशिक वैरागडे,
