सर्वोदय विद्यालयात आरोग्य तपासणी

सहसंपादक: रामभाऊ भोयर

राळेगाव प. स. अंतर्गत येत असलेल्या स्थानिक सर्वोदय विद्यालय रिधोरा येथे शिक्षक दिनी जिल्हा व तालुका शासकीय आरोग्य पथकामार्फत सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सर्वप्रथम मुख्याध्यापक श्री टी. झेड. माथनकर यांनी चमुचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले.यात डा.श्रीकांत बहाड सर, डा. डुकरे मॅडम, ए एन एम. सिडा म मॅडम, फार्मसिस्ट गिंनगोले मॅडम उपस्थित होते. आरोग्य तपासणी करून काहीना मेडीसिन देण्यात आली. शाळेचा स्वच्छ व आरोग्यवर्धक परिसर पाहून डॉक्टर्स नी समाधान व्यक्त केले. सदर कार्यासाठी वी. एन. लोडे, पी. पी. आसुटकर, आर. एस. वाघमारे, बी. बी. कामडी, वी. टी. दुमोरे, एस. एम. बावणे, एस. वाय. भोयर यांनी परिश्रम घेतले.