नशाबंदी मंडळ तर्फे व्यसनाची होळी,विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहावे यासाठी जनजागृती मोहीम

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

प्राथमिक मराठी शाळा,नविन वस्ती राळेगाव येथे यवतमाळ जिल्हा संघटक नशाबंदी मंडळ महा.राज्य ,अड. रोशनी वानोडे (सौ. कामडी) यांचे मार्गद्शनाखाली व्यसनाची होळी साजरी केली. विद्यार्थ्यांनी व्यसनापासून स्वतः व परिवाराला दूर ठेवण्याविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विस्तार अधिकारी सी.के.शेळके सर यांनी निर्व्यसनी पिढी निर्माण व्हावी.यासाठी सर्वांनी सहकार्य करावे ही भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका प्रज्ञा पाटील यांनी केले विविध अंगी उपक्रमातून आदर्श विद्यार्थी घडावा ही भावना त्यांनी व्यक्त केली शिक्षिका पुष्पा गेडाम, विजयकुमार गेडाम, अंगणवाडी सेविका मंदाताई आमटे, अनुष्का धुमाळ उपस्थित होते. व्यसनमुक्तीची शपथ व प्रतिकात्मक होळीचे दहन करून कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले
.