
सहसंपादक : रामभाऊ भोयर
मा. पोलीस अधीक्षक कुमार चिंता सा. यांचे संकल्पनेतून ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत पोलीस व जनता यांचे संबंध सलोख्याचे करण्याकरिता गावांपासून ते जिल्हा पातळीवर क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे त्याचाच एक भाग म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वेंजने पांढरकवडा यांचे मार्गदर्शनाखाली वडकी पोलीस स्टेशन येथे दिं ९ जानेवारी २०२५ रोजी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या कबड्डी स्पर्धेत करंजी (सोनामाता) येथील टीम ने प्रथम क्रमांक मिळविला आहे.
या घेण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेत मध्ये एकूण १४ संघांनी सहभाग नोंदविला असून या कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक – करंजी सोनामाता, द्वितीय क्रमांक सावित्री पिंप्री, तृतीय क्रमांक झुल्लर येथील संघांनी असून मिळविला असून त्यांना वडकी पोलीस स्टेशनच्या वतीने ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला असून पुढील स्पर्धेकरिता करंजी सोनामाता येथील टीम ची निवड करण्यात आलेली आहे. सदर सामने यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सरोदे सर खैरी आणि राकेश सर सैनिक पब्लिक स्कूल यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली शिवाय वडकी पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व अंमलदार यांनी चांगली मेहनत घेतली असून ही कबड्डी स्पर्धा उत्साहात व शांततेत पार पडले आहे.
