
,
हिमायतनगर नगरपंचायतीचा ढोबळ कारभार उघडकीस.
हिमायतनगर प्रतिनिधी ( परमेश्वर सुर्यवंशी)
हिमायतनगर तालुक्यातील मौजे नेहरु नगर येथील विहिरीचे झालेले अतिक्रमण थांबुन गुंत्तेदारावर त्वरीत कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठा साम्राज्य संघ हिमायतनगर यांनी मुख्यधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.नेहरु नगर मधील मालमत्ता क्रमांक ३१७ हे नागरीकांच्या वापरात असलेल्या विहिरीचे पुरावे नष्ट करुन त्या ठिकाणी काही राजकीय षडयंत्र रचुन गुत्तेदारानी विहिरी बुजुन त्या ठिकाणी मजबुत बांधकाम करून लाखो रुपये असलेली जमीन हडपण्याचा प्रयत्न केला त्यामुळे हिमायतनगर नगरपंचायतचत व गुत्तेदाराचा काही देवाण घेवाण झाली का असा आरोप देखील अध्यक्ष यांनी केला आहे नहेरु नगर हे नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गाला लागुन असल्यामुळे तेथील जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत त्यामुळे अनेक जन ते जागा हडपण्यासाठी प्रयत्न करीत आहे जर का त्या ठिकाणी बांधकाम थांबुन ते विहीर नागरिकांना वापरण्यास खुली केली तर नागरीकाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही कारण काही दिवसांपूर्वी नागरीकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत होता या विहिरीतुन नागरीकांना पाण्याचा जलस्त्रोत होत होता आज नागरीकांना विहिर बुजविल्यमुळे भविष्यात पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते त्यामुळे आज विहिरीचे अतिक्रमण थांबुन नागरीकांना खुली करुन देण्यात यावी संबंधित गुत्तेदावर शासकीय मालमत्ता हडण्याची कारवाई करावी अशी मागणी केली जर का येत्या दोन-तीन विहीर पुर्ण पणे नागरिकांना खुली नाही केली तर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करु आशा इशारा ता अध्यक्ष यांनी दिला आहे महाराष्ट्र राज्य मराठा साम्राज्य संघ यांनी नायब तहसीलदार ए एम तामसकर यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे त्या वेळी उपस्थित हिमायतनगर तालुकख अध्यक्ष माधव किसन शिंदे संस्थापक बाबाराजे देशमुख नामदेव नाईकवाड प्रमेश्वर गायकवाड राहुल खंडागळे बाबुराव शिंदे नितिन पगलवाड राजु नरवाडे राजु जाधव संतोष मादसवार बाबुराव मेंडके आदि कार्यकर्ते उपस्थित होते
