
उमरखेड तालूका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )
ढाणकी येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारत अभियान ही योजना सध्यस्थितीत संपूर्ण देशभरात उच्च शिखरावर पोहोचल्याने दिसत आहे स्वच्छ भारत अभियान ही योजना राबविल्या जाणारी ही योजना, नागरी धनकचरा व्यवस्थापन यामध्ये नुकतीच नविन झालेली ढाणकी नगरपंचायत चा समावेश करण्यात आला या योजने अंतर्गत ढाणकी शहरातील घनकचरा व्यवस्थापन करीता दोन ट्रॅक्टर, दोन तीन चाकी ऑपे, ऑटो. दहा डस्टबिन व हॅन्डग्लोज, मास्क, रेनकोट, होमथिंटर, बूट, प्रोजेक्ट, इत्यादी किरकोळ साहित्य अंदाजे पंचवीस लाख रुपये रक्मेचे साहित्य ढाणकी नगरपंचायतला भेटले असून आज ढाणकी शहराचे प्रथम नगरअध्यक्ष सुरेश जयस्वाल यांच्या उपस्थित नविन भेटलेल्या साहित्याचे पूजन करण्यात आले यावेळी उपनगर अध्यक्ष शेख जाहीर शेख मौला. नगरसेवक बाळू योगेवार, शेख इरफान, नगरसेविका बसनूरबी सय्यद, खलील, नगरसेवक बाळासाहेब गंधेवार तसेच नितीन ठाकूर, रमेश गायकवाड, प्रकाश जयस्ववाल शेख मिराजी,व तसेच नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते
