नगर सेवकाला धमकी देणाऱ्या नगराध्यक्षाच्या विरोधात तक्रार दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
धिरज दिगांबर पाते (32) रा.वासेकर ले आउट वणी
असे फिर्यादी नगरसेवकाचे नाव आहे.
नगर सेवक धिरज दिगांबर पाते यांनी दि.१३ सप्टेंबर रोजी नगर परिषद वणी येथे अधीकार अधिनियम अन्वये दि. 3/08/2018 रोजी इतिव्रुत्ताच्या सत्य प्रतिची माहिती मागीतली होती. या बाबतचा राग मनात धरुन आज दि.16 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10:45 वाजताचे सुमारास नगराध्यक्ष श्री तारेंद्र गंगाधरराव बोर्डे यांचा नगर सेवक धिरज पाते यांना फोन आला की, तुम्ही दिलेल्या तक्रारी संदर्भात काय बोलायचे आहे त्याबाबत माझ्या केबिनला या,असे सांगीतल्याने पाते हे नगरपरिषद वणी येथे नगराध्यक्षांच्या केबीन मध्ये गेले असता त्यांनी तु माझी कंप्लेंट केली असे म्हणत मी तुला पाहून घेईल व तुझे कामे कोणते आहे असे म्हणुन धमकी दिली व तु कुठंही भेटला तर पाहून घेईल, मी का करू शकतो माझी पोच कुठवरी आहे हे तुला माहिती आहे. मी तुला कोणत्याही खोटया प्रकरणामध्ये कधीहि अडकऊ शकतो व तुझ्या जिवाचे काही करू शकतो असे म्हटल्यानंतर धिरज यांनी नगराध्यक्षांना भाऊ मी तुमची कुठलीही तक्रार केली नाही मी फक्त सभेची माहिती मांगीतली असे म्हणुन धिरज कबीनचे बाहेर निघून गेले. त्यानंतर नगराध्यक्ष कडुन जिवाला धोका असल्याने धिरज पाते यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. या तक्रारीवरुन पोलीसांनी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.