बारावीच्या विद्यार्थ्यांना वर्ग अकरावीकडून निरोप समारोप संपन्न

सहसंपादक : रामभाऊ भोयर

गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंतरगाव येथे वर्ग १२ च्या विद्यार्थ्यांना वर्ग ११ वी कडुन निरोप समारोपाचे आयोजन करण्यात आले होते, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य राजेश शर्मा, प्रमुख पाहुणे राजकुमार तागडे, वरिष्ठ शिक्षक,प्रा.प्रभाकर लाकडे,प्रा.अनिल चाफले व प्रा.श्रीहरी नरड हे मंचावर उपस्थित होते.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सर्वच वक्त्यांनी परीक्षा नियोजन, अभ्यास, आणि भावी जीवनात सुसंस्कृत नागरिक बनुन समाज व देशाप्रती कसा आदर्श ठेवला पाहिजे हे समजावून सांगितले.अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य राजेश शर्मा यांनी तीन मुल्ये विज्ञानवाद, विवेकवाद व मानवतावाद समजावून सांगितला व देशाचे सुजाण नागरिक बनुन देश सेवेला वाहुन घ्या असा संदेश दिला.
कु.प्रांजली गोहणे,सानिका वाघमारे,मयुरी काचोळे,श्वेता ठाकुर,कोमल ठाकुर या विद्यार्थ्यिनी आपले मनोगत व्यक्त केले,सुदर्शना वैरागडे हिने कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचलन केले आणि सानिका झोटींग हिने कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले, राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.