किरणभाऊ कुमरे यांनी राळेगाव मतदार संघ पिंजून काढला, रूंझा,मोहदा, उमरी करंजी या गावांना दिल्या भेटी

सहसंपादक : रामभाऊ भोयर

विधानसभा निवडणुका जशा जाहीर झाल्या तसाच अनेक उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते आदिवासी सेवक किरणभाऊ कुमरे यांनी सुद्धा पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे.अशातच किरण कुमरे यांनी उमेदवारीची वाट न बघता आपला प्रचाराचा प्रवास सुरू केला आहे.त्यांनी राळेगाव विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला असून ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते असल्याने त्यांना प्रत्येक गावात प्रतिसाद मिळत असून किरण कुमरे यांनी प्रचारात चांगलाच वेग घेतला असून दिनांक १८/९/२०२४ रोजी सुद्धा प्रचाराच्या भेटी दरम्यान त्यांनी विधानसभा क्षेत्रातील रूंझा मोहदा उमरी करंजी या गावांना भेटी देऊन रूंझा येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ येथील गणपतीचे दर्शन घेतले.त्यावेळी पांढरकवडा पंचायत समितीचे माजी सभापती श्री पंकज तोडसाम आणि त्यांचे कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते. किरण कुमरे हे कांग्रेस पक्षाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य आणि आदिवासी सेवक म्हणून ख्याती प्राप्त असल्याने आणि सर्व नेते, कार्यकर्ते परिचित असल्याने त्यांना या जनसंपर्क दौऱ्यात समाधान मिळत असल्याचे किरण कुमरे यांनी म्हटले असून राळेगाव मतदार संघाचे महाविकास आघाडीची उमेदवारी निश्चित आपल्यालाच मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे.