
सहसंपादक : रामभाऊ भोयर
गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंतरगाव येथे गुरु पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला यावेळी अनुलोम संस्थेच्या समन्वयक व समुपदेशिका सौ.अर्चनाताई क्षिरसागर उपस्थित होत्या.. त्यांनी गुरु पौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांना गुरु शिष्य परंपरा व आपण कोणाकोणास गुरु म्हणावे यावर प्रकाश टाकला,त्याच बरोबर त्यांनी विद्यार्थ्यांना गुड टच,बैड टच व आपल्या सोबत कोण कसा वागतो आहे हे ओळखण्याच्या काही टिप्स समजावून सांगितल्या,विशेष करुन मुलींनी कोणती काळजी घेतली पाहिजे याबाबत चे मार्गदर्शन केले.
त्यानंतर व्यसनापासून दूर व सामाजिक भान ठेवून उद्याचा नागरिक कसा असावा याबाबतीत सर्व विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले…
