प्रत्येक रविवारी होत आहे वृक्षारोपण सामाजिक संघटनांचा पुरस्कार

सहसंपादक : रामभाऊ भोयर

शासनाच्या वृक्षारोपण कार्यक्रमाची वाट न पाहता राळेगाव शहरातील काही सामाजिक संघटनांनी प्रत्येक रविवारी विविध ठिकाणी किमान दहा व जास्तीत जास्त पन्नास वृक्षारोपण करण्याचा निर्धार केला आहे त्याची रीतसर सुरुवात दिनांक 3 जून पासून झाली सध्या दोन रविवारला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे राळेगाव येथील मॉर्निंग ग्रुप तसेच वृक्ष संवर्धन समिती ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ या माध्यमातून प्रत्येक रविवारी प्रभागात जाऊन वृक्षारोपण केले जात आहे या कार्यक्रमात परिसरातील नागरिक मोठ्या उत्साहाने स्वयंस्फूर्तीने या कार्यक्रमात सहभागी होत असल्याचे चित्र राळेगाव शहरात दिसले….. नगरपंचायत उपाध्यक्ष जानराव गिरी यांच्या मार्गदर्शनात मॉर्निंग ग्रुप हा स्थानिक स्मशानभूमीत तसेच ऑक्सिजन पार्क येथे वृक्षारोपण करीत आहे त्यांनी आतापर्यंत 200 वृक्षांची लागवड केली आहे त्यात वड पिंपळ कडुलिंब विद्यावृक्ष अशा विविध जातींच्या वृक्षारोपणाची जबाबदारी घेतली आहे तर वृक्ष संवर्धन समिती व ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळाच्या वतीने देखील प्रत्येक प्रभागात वृक्षारोपण केले जात आहे त्यांनीही ऑक्सिजनजन्य वृक्षांची लागवड करून प्रत्येक घरी जाऊन वृक्ष रोपण व वृक्ष संवर्धनाचे जनजागृती करीत आहे यात युसूफ अली सय्यद व कृष्णाजी राऊळकर यांच्या मार्गदर्शनामध्ये हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न होत आहे यात महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत रविवारी स्थानिक गणेश नगर येथे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी प्रभागातील भावना खनगन शितल कोल्हे अर्चना कदम राधिका कोकरे शितल कुडसंगे सुरेश राऊत भानुदास राऊत फिरोज लाखांनी सुरेंद्र ताठे चेतन ढगे मधुकर कोमेजवार प्रभाकर घोडेवार सुरेश सरोदे नामदेव तिजारे वाल्मीक मेश्राम मधुकर गेडाम यांनी पुढाकार घेतला प्रत्येक रविवारी पावसाळापर्यंत वृक्षारोपण व नंतर वर्षभर वृक्ष संवर्धनाची जबाबदारी या सामाजिक संघटनांनी घेतली आहे स्थानिक नगरपंचायत कडून सामाजिक संघटनांना वृक्षारोपणाकरिता रोपटे पुरविले जात आहे हे विशेष