
ढाणकी प्रतिनिधी -प्रवीण जोशी.
दिव्यांग बंधूंसाठी स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन होणार असल्याने ढाणकी शहरात दिव्यांग बंधूंनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येऊन आनंद साजरा केला.
पुरोगामी विचारसरणीचा समजला जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये असे स्वतंत्र मंत्रालय स्थापन होणार असल्याने निश्चितच दिव्यांग बंधूंसाठी ही दिलासा देणारी बाब आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू हे दिवांगांच्या हक्क व न्यायासाठी नेहमी झगडत असतात. त्यांच्याच विशेष प्रयत्नामुळे राज्यात लवकरच दिव्यांग मंत्रालय स्थापन होणार असून यामुळे दिव्यांग बंधूंना न्याय मिळेल या दुमत नाही. नुकतेच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. मंत्रालयाच्या घोषणे मुळे मुळे आनंदित झालेल्या दिव्यांग बंधूंनी ढाणकी शहरात आनंद व्यक्त केला. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे उमरखेड तालुका अध्यक्ष सय्यद माजिद सय्यद पाशा हे उपस्थित होते. ते सुद्धा दिव्यांगाच्या या आनंद उत्सवात सहभागी झाले व त्यांचा आनंद द्विगुणीत केला. प्रहार जनतक्षिपक्ष हा शेवटच्या क्षणापर्यंत दिव्यांग बंधूंच्या सोबतच असेल व त्यांच्या न्याय व हक्कासाठी सदैव त्यांच्या पाठीशी उभा असेल असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी दिव्यांग संघटनेचे शेख मुजमिल शेख मुसा, श्याम शिराळे, चंद्रशेखर तोटेवाड, प्रदीप येरावार, आवेज पठाण, रामू लिंगमपल्ले, रामू कोरटवाड, शेख साजिद, सय्यद सरदार, उत्तम पेंढरवार, पूजा पेंढरवार, इत्यादी सदस्य उपस्थित होते.
