जि.प.शिक्षकांची दिले कोविड सेंटरला ऑक्सिजन सिलेंडर भेट

प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ,काटोल

व्हाट्सएपच्या मदतीने केले ३.५ लक्ष गोळा

काटोल विधानसभा जि.प.प्राथमिक शिक्षक आघाडी

तालुका प्रतिनिधी/१३मे
काटोल : शिक्षक हा समाजशील प्राणी आहे.देशावर आलेल्या प्रत्येक संकटात शिक्षकांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.वैश्विक कोरोना संकटात शिक्षक स्वतःला वेगळा कसा ठेऊ शकेल ?
‘काटोल विधानसभा जि. प.प्राथमिक शिक्षक आघाडी’ या व्हाट्सएप ग्रुपच्या माध्यमातून काटोल नरखेड तालुक्यातील जवळपास ३०० शिक्षकांनी सामाजिक दायित्वचा भाग म्हणून ३.५ लक्ष रुपये गोळा केले.या कोविड निधीतून ग्रामीण रुग्णालयात, काटोल येथे पाच जम्बो ऑक्सिजन सिलेंडर फ्लो मिटरसह व दोन इन्व्हर्टर बॅटरी देण्यात आली.तसेच ग्रामीण रुग्णालय, नरखेड येथे सुमारे दीड लक्ष रुपयाची कोरोनावरील औषध भेट म्हणून देण्यात आली.हे सर्व साहित्य जि. प.शिक्षकांनी वैद्यकीय अधिक्षक डॉ.दिनेश डवरे व वैद्यकीय अधिक्षक डॉ.सुधीर वाघमारे यांच्याकडे सुपूर्द केले.
जिल्हा परिषद मधील शिक्षकांनी राबविलेल्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.सर्वसामान्य जनतेसाठी शिक्षकांनी दाखविलेली सामाजिक दातृत्वाची कृती कौतुकास्पद व इतरांसाठी प्रेरणादायी असल्याची प्रतिक्रिया वैद्यकीय अधिक्षक डॉ.दिनेश डवरे यांनी दिली.