
)
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निर्मितीपासूनच जिल्हा व तालुक्याच्या राजकारणात खैरी हे गाव अग्रेसर असेच आहे. परंतु नेतृत्व व नेतेच्या मानाने खैरी हे गाव विकास कामापासून मात्र कोसो दूरच आहे. परिसरातील लहान खेडेगावातील ग्रामपंचायत ना विकास कामामुळे मानांक मिळून पुढे जात आहे. मात्र येथील पुढाऱ्यांना गावाचे मानांकन मिळवण्यापेक्षा आमदार खासदार अध्यक्ष यांच्या पाठीमागे पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून फिरण्यात धन्यता मानताना दिसतात. गाव विकासात मात्र कुठेच अग्रेसर दिसत नाही. फक्त पक्षभेद मतभेद हा या पक्षाचा तो त्या पक्षाचा यातच धन्यता मानतांना दिसतात.
खैरी येथे वैद्यकीय व पशुवैद्यकीय असे दोन दवाखाने आहेत परंतु दवाखान्यात डॉक्टरच नाही याकडे कुण्याही पक्षाचे नेत्याचे लक्ष नाही. वैद्यकीय दवाखान्या साठी दिलेल्या शेतावर दुसऱ्याने कब्जा केला त्यातही इथले नेते मंडळी राजकारण करीत आहे. आठवडी भरणाऱ्या बाजाराच्या जागेवर अतिक्रमण होऊन बाजाराला जागा कमी पडते त्याकडे येथील प्रशासनाचे दुर्लक्ष होतं आहे. वास्तविक आठवणी बाजाराच्या जागेचा सातबारा ग्रामपंचायत प्रशासनाकडे आहे पण पुढाऱ्यांच्या जवळच्या लोकांचे त्या जागेवर अतिक्रमण असल्यामुळे सर्वच चुप्पी साधून बसले आहे. मात्र या चूप्पीमुळे आठवडी बाजार दुसरीकडे जातो की काय हे सांगणे कठीण आहे.
पूर्वी गावात जाण्यासाठी मोठे रस्ते होते आता मात्र एक लहान वाहन गावात नेताना त्रास होतो ही वास्तविकता आहे. एवढे अतिक्रमण रस्त्याच्या दुतर्फा वाढले आहे. अतिक्रमण हटविण्याची प्रशासनात हिंमत नाही कारण अतिक्रमणधारक े या पुढार्यांचे हितचिंतक आहे. त्यामुळे अतिक्रमण काढायला प्रशासन धजवतोय.
गावात पाणीपुरवठ्याची एकच विहीर आहे त्या विहिरीवर जायला धड रस्ता नाही याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे पूर्वीपासून दुर्लक्ष होत आहे. नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली म्हणून 2018 पासून गाजावाजा होत आहे. पाणीपुरवठा योजना मंजूर केल्याचे शुभेच्छा फलक ही मागे लागले होते. परंतु आज पावतो ह्या योजनेचे साधे भूमिपूजन सुद्धा झाले नाही. त्यामुळे ही योजना मंजूर आहे की नाही हे न उलमगडनारे करणारे कोडे आहे! मात्र योजना मंजुरीचे श्रेय घेण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे नेते व कार्यकर्ते मात्र कायम उतावीळ दिसतात.
ग्रामस्वच्छतेच्या बाबतीत तर विचारच नको जिकडे पाहावे तिकडे चारही बाजूने घाणीचे साम्राज्य आहे कचरा आहे झाडझुडपे आहे. पंचायत समिती व ग्रामपंचायत प्रशासनाने एकाच ठिकाणी तीन तीन स्वच्छतागृह बांधून एक विक्रमच केला. मात्र या स्वच्छतागृहाचे आजूबाजूला नेहमी कचरा व घाणीचे साम्राज्य पाहायला मिळतात. यावरून ग्रामस्वच्छतेचा बोजवारा काढता येतो. ग्रामपंचायत प्रशासन कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नियोजन नाही (एखादा अपवाद वगळता) एक से बढकर एक कर्मचारी येथील ग्रामपंचायत मध्ये दिसतात. स्मशान भूमी कडे जाणाऱ्या रस्त्यावरील नाल्यावर पूल नाही त्यामुळे प्रीतयात्रा नेतांना खूप त्रास होतो मात्र प्रशासन व येथील पुढाऱ्यांना याचे देणेघेणे नाही.
यावरूनच खैरी येते सर्वच पक्षाचा बोलबाला असून येथे सर्वच पक्षाचे पुढारी आहे व या आधीही होते. त्याआधी पंचायत समिती सभापती, उपसभापती, सदस्य अशी पदे येथील पुढाऱ्यांनी भोगली आहे. मात्र येथील अनेक योजना कामे इतरत्र हळवी ला गेली त्यामुळे ह्या गावाचा विकास होऊ शकला नाही ुढार्यांनी मनावर जर घेतले असते तर विकासात्मक कामात खैरे गाव अग्रेसर असते परंतु तसे झाले नाही व विकासापासून खैरी हे गाव दूरच राहिले. येथील लोक खूप चांगले आहेत परंतु विकासात्मक मागे पडले आहे म्हणून खैरी हे गाव तसं चांगलं पण पुढाऱ्यामुळे वेशीला टांगलं म्हणण्याची वेळ आजच्या तरुण पिढीवर आली आहे.
