
सर्व समाज घटकांच्या एकजुटीने गावाचा विकास-माधव कोहळे
सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील देवधरी येथे बारा अभंग व कार्तिक काल्याच्या निमित्त कार्यक्रम आयोजित केला होता सदर कार्यक्रम मध्ये गोंड गोवारी आरक्षण संरक्षण समिती फलक अनावरण करण्यात आले
गावातील सर्व समाज घटक एकत्र येऊन कार्य केल्यास गावाचा सर्वांगीन विकास शक्य आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते माधव कोहळे यांनी केले.
सदर कार्यक्रमाचे प्रसंगी गावातील आदिवासी गोंड गोवारी समाजाचे वतीने आदिवासी गोंड गोवारी आरक्षण संरक्षण समिती या संघटनेच्या नाम फलकाचे ऊद्घाटन माधव कोहळे यांचे हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी देवधरीचे पोलिस पाटील भास्करराव आमने हे होते.मंचावर उपसरपंच ज्योतीताई भारसाकळे,तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम दुधकोहळे,सुभाष लसंते,बंडू भारसाकळे,बादल लसंते,गजानन ठाकरे,महादेव टेकाम,विकास लसंते,दशरथ भारसाकळे इत्यादी मान्यवर हजर होते.कार्यक्रमाचे सुञसंचालन व आभार प्रदर्शन विजय नैताम यांनी केले.
