
सहसंपादक: रामभाऊ भोयर
मध्यरात्री दोन ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे .यामध्ये दोन्ही ट्रक चालक जखमी झाल्याची घटना दि २ एप्रिल रोजी मध्यरात्री वडकी येथील राष्ट्रीय महामार्ग क्र ४४ वर असलेल्या रेश्मा पार्क समोर घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की ट्रक चालक वारीस पठाण हा आर.जे २७ जी.इ १६७७ नंबरचा ट्रक घेऊन बेंगलुर येथून दिल्ली येथे कुरियर घेऊन भरधाव वेगात जात असतांना समोरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक क्र एन.एल ०१ ए.सी १९३७ चालक सुजातअली खान याचे ट्रक ला जबर धडक दिली.हा अपघात इतका भीषण होता की ट्रक क्र आर.जे २७ जी.इ १६७७ हा डिव्हायडर तोडून १०० फूट अंतरावरील असलेल्या एलेवन केव्ही ची लाईन तसेच एल टी लाईन चे दोन्ही लोखंडी पोल तोडून रेश्मा पार्क लेआऊट मध्ये जाऊन आदळला.यामध्ये एलेवन केव्ही लाईनचे तार तुटल्याने रात्रभर गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता.हा अपघात बघण्यासाठी गावातील नागरिकांनी घटनास्थळी प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती. यामध्ये सुदैवाने कोणतीच जीवितहानी झाली नाही मात्र दोन्ही चालकांना किरकोळ दुखापत झाली.जखमी चालकांना १०३३ रुग्णवाहिकेवर कार्यरत असलेले सलमान पठाण शरीफ शेख यांनी घटनास्थळी तात्काळ दाखल होऊन रुग्णांना करंजी येथे हलविले.
या धडकेत दोन्ही ट्रकचे ड्रायव्हर केबिंन्स पूर्णपणे उध्वस्त झाल्या आहेत.
दोन्ही ट्रकचे उध्वस्त झालेले साहित्य रस्त्यावर पडल्याने रस्त्यावर रहदारीला अडथळा निर्माण झाला होता .या घटनेची माहिती वडकी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन रस्त्यावर अडथळा निर्माण करणारा अपघातग्रस्त ट्रक क्रेन ने बाजूला करून रस्ता वाहतुकीस खुला केला.
