
पर्यावरण पूरक जीवन पद्धती अभियानांतर्गत तालुक्यातील झाडगाव येथे तालुका स्तरीय कार्यशाळा घेण्यात आली आहे.
यावेळी मार्गदर्शन करतांना सोयाबीन हे स्वपरागसिंचित पीक आहे. या पिकाचे बियाणे सरळ वाहनाचे आहे यामुळे दरवर्षी बियाणे बदलण्याची आवश्यकता नाही. मागील दोन वर्षात वापरलेली प्रमाणित बियाण्यापासून उत्पादित होणारे सोयाबीन बियाणे हे शास्त्रीयदृष्ट्या पेरणीकरिता योग्य असते तसेच घरचे बियाणे वापरताना चाळणी करून घ्यावी,बियाणे नाजूक असल्याने पोत्याची हाताळणी व वाहतूक करताना योग्य काळजी घ्यावी तसेच बीज प्रक्रिया केल्याशिवाय सोयाबीन ची पेरणी करू नये असे आवाहन कीटकशास्त्रज्ञ डॉ.प्रमोद मगर यांनी तालुका स्तरीय कार्यशाळेत बोलताना व्यक्त केले आहे.
या कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ येथील अभियांत्रिकी शाखेचे विषय विशेतज्ञ राहुल चव्हाण तसेच कीटक शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मगर, उपविभागीय कृषी अधिकारी तथा तालुका कृषी अधिकारी अमोल जोशी, मंडळ कृषी अधिकारी श्री.विजय धांडे आत्माचे बिटीएम मयूर शिरभाते, कृषी सहाय्यक कु.श्रुती भोयर तसेच प्रगतशील शेतकरी आधी मोठ्या संख्याने उपस्थित होते, कृषी विभाग, आत्मा व कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने झाडगाव येथे पर्यावरणपूरक जीवनपद्धती अभियान कार्यक्रम पार पडले या कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ येथील अभियांत्रिकी शाखेचे विषय विशेषज्ञ .राहुल चव्हाण यांनी बीबीएफ तंत्रज्ञानाचे महत्त्व तसेच बदलत्या वातावरणाची पीक पद्धतीवर परिणाम होत असल्याबाबतचे मार्गदर्शन केले. कीटकशास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मगर यांनी सोयाबीन बीच प्रक्रिया करणे, कमी खर्चात उत्तम पद्धतीची शेती तंत्रज्ञान, किडीचे नियोजन कसे करता येईल याविषयी सखोल मार्गदर्शन केले. या नंतर तालुका कृषी अधिकारी .अमोल जोशी यांनी कृषी विभागाचे विविध योजनेची माहिती शेतकऱ्यांना दिली या नंतर कु. श्रुती भोयर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कृषी विभागाचे विविध योजनेची माहिती तसेच सोयाबीन पेरणीची अष्टसूत्री, पेरणीपूर्वी उगवण क्षमता तपासणे, बीज प्रक्रिया तसेच कृषी विभागाच्या विविध योजनेची माहिती. तसेच प्रधानमंत्री सुष्म अन्नप्रक्रिया उद्योगाची माहिती दिली, तसेच या नंतर मंडळ कृषी अधिकारी .विजय धांडे यांनी बीबीएफ पद्धती चे महत्व या विषयावर मार्गदर्शन केले तसेच प्रेरणीपूर्वी उगंवनक्षमता तपासणी करणे, बीज प्रक्रिया पद्धतीचा अवलंब करणे व कृषी निविष्ठा खरेदी करताना घ्यावयाची काळजी आधी विषयवर मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी अमोल जोशी यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विजय धांडे मंडळ कृषी अधिकारी राळेगाव यांनी केले सदर कार्यक्रमाला झाडगाव येथील प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
