राळेगाव तालुक्यातील 34 गाव पोलीस पाटील विना ,शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर:पुरुषोत्तम निमरड

दिनांक 25/08/2022 रोजी यवतमाळ जिल्हा शांतता समितीची सभा नियोजन भवन,जिल्हाधिकारी कार्यालय येथे मा.जिल्हाधिकारी साहेब यांचे अध्यक्षतेखाली व मा.जिल्हा पोलीस अधिक्षक साहेब यांचे प्रमुख उपस्थितीत आगामी सन पोळा , गणपती उत्सव शांततेत होण्याच्या दृष्टीने शांतता समितीचे सदस्यांचे मनोगत ऐकुन घेऊन मा.जिल्हा पोलीस अधिक्षक श्री.भुजबळ साहेब आणि मा.जिल्हाधिकारी श्री.येडगे साहेब यांनी मार्गदर्शन केले.
श्री.पुरूषोत्तम निमरड सदस्य जिल्हा शांतता समिती तथा सेवानिवृत्त पोलीस पाटील रा.वेडशी पो.स्टेशन वडकी यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना राळेगांव तालुक्यात 34 गावामध्ये पोलीस पाटील पद रिक्त आहे आणि पोलीस पाटील हे प्रशासनाचे नाक,कान आणि डोळे
असणारेच नसेल तर त्या गावातिल शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्मान झाल्यास प्रशासनास माहिति कोण देणार ? असा प्रश्न उपस्थित करून राळेगांव तालुक्यातच नाही तर संपुर्ण तालुक्यात रिक्त असलेल्या गावामध्ये पोलीस पाटील यांची नियुक्ति लवकरात लवकर करण्यात यावी असे मनोगत व्यक्त करून मा.जिल्हाधिकारी साहेब आणि मा.पोलीस अधिक्षक साहेब यांना तशा प्रकारचे निवेदन राळेगांव तालुक्यातिल राळेगांव आणि वडकी पोलीस स्टेशन मधिल रिक्त पोलीस पाटील यांचे गावासह दिले आहे.
राळेगांव पो.स्टेशन मधिल रिक्त गांव :–1)इचोरा,(2)आष्टा,(3)मांडवा,(3)लोहारा,(4)पिंपळखुटी,(5)शेळी,(6)गुजरी,(7)बंदर,(8)सराठी,(9)गुजरी,(10)आंजी,(11)डोंगरगांव,(12)कृष्णापूर,(13)दापोरी
पो.वडकी:–(1)खैरी,(2)वाढोणा बाजार,(3)पिंपळापूर,(4)चहांद,(5)धानोरा,(6)येवति,(7)वेडशी,(8)सावरखेड,(9)आष्ठोणा,(10)एकुर्ली,(11)खैरगांव(जवादे),(12)खैरगांव(कासार),(13)झुल्लर,(14)लाडकी,(15)देवधरी,(16)भुलगड,(17)घुबडहेटी,(18)भिमसेनपूर,(19)खातारा ,(20)मुंझाळा,(21)सिंगलदिप

1