
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील वरुड जहांगीर या गावात अनेक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहत असून आपापल्या पद्धतीने ते सुद्धा आपापले सण साजरे करतात.अशातच या गावात बंजारा समाज सुद्धा सर्वांसोबत मिळून मिसळून राहतो.अशातच या बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज आणि माता जगदंबेचे मंदिर या समाजाने सामाजिक वर्गणीतून बांधले असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून या वरूड जहांगीर गावातील समाजबांधव एकोप्याने दरवर्षी संत सेवालाल महाराज जयंती साजरी करत असतांनाच मागील काही वर्षांपासून शासनाने या जयंतीला शासनस्तरावर साजरी करण्याचे आदेश दिल्यानंतर या जयंतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी या समाजबांधवाने सेवालाल महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या जयंती सप्ताहात सात दिवसाचा सप्ताह पाळण्यात आला.पहिल्या दिवसांपासून संत सेवालाल महाराजाचे अध्यायाचे सात दिवसांपर्यंत आमच्या वरूड जहांगीर येथील ह.भ.प. मधूकर जाधव महाराज यांनी वाचन केले.सोबतच दररोज वेगवेगळ्या प्रकारचे बंजारा भजन सुध्दा सादर करण्यात आले.गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या या सप्ताहामुळे संत सेवालाल नगरीत खूप प्रसन्न वातावरण निर्माण झाले होते.कार्यक्रमाच्या सहाव्या दिवशी समाजबांधवांना महासादाचे आयोजन करण्यात आले आहे.सातव्या दिवशी म्हणजे संत सेवालाल महाराज जयंतीच्या दिवशी महाशिवरात्री आल्यामुळे बऱ्याच भाविक भक्तांचा उपवास राहात असल्याने महाप्रसादाचे आयोजन 14 तारखेला पार पडला. तर 15 फेब्रुवारीला संत सेवालाल महाराज जयंती दिनी सकाळी ठिक 12 वाजता संत सेवालाल महाराजाची पालखी मिरवणूक वाजतगाजत भजन मंडळ, समाजबांधवांच्या उपस्थितीत मंदिरातून तांड्यातून निघून गावात पोहचली.गावात गेल्यानंतर ग्राम पंचायत कार्यालयाच्या आवारात असलेल्या शंकरजीचे पुजन घेऊन दर्शन घेतले त्यानंतर हनुमानाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले सोबतच आईची पुजा करुन पुढे निघाली समोर गेल्यावर बिरसामुंडाचे पुजन करून दर्शन घेतले.शेवटच्या क्षणी हा पालखी सोहळा रघुनाथ स्वामी महाराजांच्या दरबारात पोहचून रघुनाथ स्वामी महाराजांचे पुजन करून दर्शन घेतले.गावातून पालखी मिरवणूक निघाली असता सर्व जाती धर्माच्या महिला भगिनींनी पालखीचे पुजन करून दर्शन घेतले आणि एकोप्याचे दर्शन घडवून समस्त बंजारा बंधू भगिनींना आनंद दिला.त्यानंतर शेवटी संत रघुनाथ स्वामी महाराजांचे दर्शन घेऊन हा पालखी सोहळा परत संत सेवालाल महाराजांच्या मंदिरात परतला.हा कार्यक्रम सर्व जाती धर्माच्या समाजबांधवांच्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी वरूड जहांगीर या पोलिस पाटील , इतरही सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी,राळेगाव पोलिस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांचे सुद्धा सहकार्य लाभले.
