रिधोरा येथे सर्वोदय विद्यालयात सुहानी येरणे हिच्या हस्ते ध्वजारोहण

राळेगाव प स अंतर्गत येत असलेल्या स्थानिक सर्वोदय विद्यालय रिधोरा येथे मार्च 2024च्या शालांत परीक्षेत प्रथम आलेल्या सुहानी येरने हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक श्री टी. झेड. माथनकर यांनी ध्वज तथा प्रतिमांचे पूजन केले व मार्गदर्शन केले. संचालन श्री आर एस वाघमारे यांनी तर आभारप्रदर्शन श्री टी बी लिल्हारे यांनी केले. प्रास्ताविक श्री पी पी आसुत्कर यांनी केले.नम्रता शेंडे, राणु वाढई, अक्षरा निकेसर, अन्वेश वाढई यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सरपंच उमेश भाऊ गौळकर, पोलीस पाटील डी बी मंदाडे, मारोतराव काळे तथा गावातील पालकवर्ग उपस्थित होते. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करुन स्वतत्रदिनाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री बी बी कामडी व्हीं टी दुमोरे एस एम बावणे एस वाय भोयर यांनी परिश्रम घेतले.