संघ प्रचारक सर्व गुणसंपन्न असावा


प्रवीण जोशी


प्रचारक एक उत्कृष्ट स्वच्छ चारित्र्याचा व कुशल आणि श्रेष्ठ कार्यकर्त्याच्या रूपात आपल्या क्षेत्रात जावे लागते. लोकांना त्यांच्यापासून तीव्र प्रेरणा मिळाली पाहिजे. प्रचाराकाला संपर्कात येणाऱ्या स्वयंसेवकांना तसेच निर्माण होणाऱ्या परिस्थितीला मोठ्या कौशल्याने योग्यतेने मार्गदर्शन करावे लागते. प्रचाराकाच्या गुणाची सूची घ्यायची झाल्यास त्याच्याकडे सर्वच गुण असले पाहिजेत, असे सांगता येईल तो चांगला वक्ता असावा, विद्वान असावा, तपस्वी असावा, त्यागी असावा, मितभाशी असावा, मधुर व्यवहार करणारा पण आर्थिक(विविध उपक्रम राबवून) व्यवहारातून आपली भरभराट कशी होईल हे न बघणारा असावा.

या सर्व प्रचारकाच्या गुणांची यादी देण्याची आवश्यकता वाटत नाही जर परीक्षण केले तर अडचणीस निर्माण होतील मनुष्यात जर कोणती गुण असतील आणि ते गुण स्वतःमध्ये यावे तशी त्यांची इच्छा असेल तर ते गुण तो अभ्यास अनुभव प्रयास या द्वारे प्राप्त करू शकतो. अशा प्रयत्ना त्रुटी असू शकतात पण याद्वारे पुढे वाटचाल करून मनुष्य आपली योग्यता वाढवत जातो म्हणून साधारणपणे अनुभव घेतल्यानंतर प्रचारकाला पाठविले जाते प्रचारकाकडून तशी कामे अपेक्षित आहेत पण सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे अन्य लोकांना कार्य करण्याची प्रेरणा त्यांनी द्यावी आणि तदनंतर सर्व कार्यकर्ते आणि परिस्थिती यांचा विचार करून त्याबाबत सुयोग्य रुपरेषा ठरवून मार्गदर्शन करावे सतर्क आणि चतुराई ने सर्वांना व्यवस्थित सांभाळात पुढे न्यावे जर एखादा स्वयंसेवक आपल्या क्षेत्रात चांगला काम करणार आहे पण लोकांना तो सांभाळू शकत नाही अशाने प्रचारक बनण्याऐवजी कार्यकर्ता होऊनच काम करीत राहिले पाहिजे हाच खरा स्वयंसेवक व प्रचारक असे गुरुजींना अपेक्षित राहिले आहे.