
सहसंपादक : रामभाऊ भोयर
सेवानिवृत्त जिल्हा परिषद शिक्षक श्री.राजेश्वररावजी मडावी, हे सेवानिवृत्त झाल्यापासून दर वर्षी जिल्हा परिषद शाळेत जाऊन 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना पेन व बुक भेट म्हणून देत असतात. या स्वातंत्र्यदिनी त्यांनी वालधूर आणि इंजापूर येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना पेन व बुक भेट दिले. या उपक्रमात त्यांना शाळेतील शिक्षक तसेच गावकऱ्यांचे सहकार्य लाभले यावेळी उपस्थित नानाजी कोवे माजी अध्यक्ष शाळा समिती वालधूर, प्रल्हाद मानकर माजी सरपंच, रजनीकांत परचाके, सुनील यादव सर,पाल सर, निळकंठजी उईके, रामाजी मानकर, चंद्रभानजी यडमे, बालाजी डोंगरे, सुवेद भेले, मोहन मानकर, महादेव शिडाम, प्रमोद जिद्देवार, नलूताई मानकर, होते.
