सोनामाता हायस्कूल चहांद मधील विद्यार्थ्यांचे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत सुयश

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला असुन यात य.मो.दोंदे सार्व.शैक्षणिक ट्रस्ट द्वारा संचालित सोनामाता हायस्कूल चहांद येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.या परीक्षेत कु. गौरी प्रमोद वारकर ही विद्यार्थिनी ८१.४०%गुण मिळवून शाळेतून प्रथम आली आहे. द्वितीय क्रमांकाचे७१.८०% गुण कु. भाविका बंसोड या विद्यार्थिनीने मिळविले. कु. श्रेया ईश्वर वैद्य या विद्यार्थिनीने ७०%गुण मिळवत शाळेतून तृतीय क्रमांक पटकावला. सन २०२३-२४या सत्रासाठी घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत सोनामाता हायस्कूल मधील एकुण १६विद्यार्थी परीक्षेला बसले त्यातील १५विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले.शाळेचा एकुण निकाल ९३.७५%इतका लागला. सर्व यशप्राप्त विद्याथ्र्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. प्रा.डॉ.पवन मांडवकर, संस्थेचे सचिव श्री धरमकर सर,शालेय व्यवस्थापन समितीच्या मा.विराताई मांडवकर यांनी कौतुक केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री अनिल धोबे सर , वर्गशिक्षक चिव्हाने सर, कांबळे सर दांडेकर सर, गोवार्दिपे मॅडम, शिवणकर सर, गावंडे मॅडम यांनी अभिनंदन केले. विद्यार्थांच्या पालकांनी सुद्धा शाळेतील शिक्षकांचे आभार व्यक्त केले आहेत.