
सहसंपादक : रामभाऊ भोयर
*
कर्तुत्ववान व्यक्ती चा सन्मान करणे म्हणजे त्या व्यक्तीच्या कार्याची पावती त्या व्यक्तीला मिळणे होय, एका अभंगात असे म्हणतात की, ” जे का रंजले गांजले , त्याशी म्हने जो आपुले, तोचि साधु ओळखावा देव तेथेचि जानावा “‘ असाच एका शिक्षकाचा निरोप समारंभ , जिल्हा परिषद शाळा दोनोडा या गावी आयोजित होता आणि मुख्य मार्गदर्शक म्हणून मा. मधुसूदन कोवे गुरुजी, अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांना आमंत्रित केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष, मा प्रभुदास पंधरे, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती आणि उपस्थित सहभागी केंद्र प्रमुख श्री मोगरकर साहेब, आणि मोनिका भोंग माजी अध्यक्ष उपस्थित होते. या निरोप समारंभ कार्यक्रमाचे सन्मानिय शिक्षक मा बंडुजी पंधरे गुरुजी हे होते,* संपूर्ण शाळेचे विद्यार्थी भावनिक होताना दिसत होते, आणि गावातील लोकांच्या प्रतिक्रिया या बदली झालेल्या शिक्षका प्रती व्यक्त होत होत्या ही त्या कर्तुत्ववान शिक्षकांच्या कार्याचा गौरव आहे, असे स्पष्ट मत मा मधुसूदन कोवे गुरुजी यांनी निरोप समारंभ कार्यक्रमांत व्यक्त करताना भावनाशील शिक्षकांना कविता च्या दोन ओळी सांगताना मा मधुसूदन कोवे गुरुजी म्हणाले “‘ अखेर चा हा तुला दंडवत, सोडून जाते गाव, दरी दरी तुनी मावळं आता देवुळं तुझं हे नांव, अखेर चा तुला दंडवत “‘ सर्व गावकरी शाळेमधील सर्व मुले भावनाशील झाले होते, या निरोप समारंभ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक या शाळेचे शिक्षक श्रीकांत फाळके यांनी केले या यशस्वी कार्यक्रमांत सर्व गावकरी, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, खिचडी शिजविणाऱ्या अन्नदाता भगिनी आणि सर्व शाळेतिल चिमुकले बालक पालक सहभागी झाले होते
