हंगामी शेवट कापूस वेचनीला मजूर मिळेना पांढरे सोनं शेतातच
मजुरांची करावी लागते मनधरणी, ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत

सहसंपादक : रामभाऊ भोयर

शेतकऱ्यांचे कापूस पीक हे नगदी पीक म्हणून ओळखले जाते त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात कापूस पिकाची लागवड करतात मात्र कापूस वेचणी करणारे मजूर मिळत नसल्याने कापूस वेचणीला मजुराची कमतरता जाणू लागलो आहे त्यामुळे लाख मोलाचे पांढरे सोने मजुरा अभावी शेतात आहे.शेतात मागील महिनाभन्यापासून कापूस वेचणी थांबली असल्याने शेतकऱ्यांची आणखीच चिंता वाढले मात्र काबाडकष्ट मेहनत करून पिकविलेला कापूस वेचून घरी आणता यावा यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.मजुरांना कापूस वेचणीसाठी विनवणी करावी लागत आहे मात्र मजुरच मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.कापूस उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा संपायला तयार नाही कधी निसर्गाची उदासीनता तर कधी शासनाचे शेतकरी विरोधी धोरण शेतकर्‍याना मारक ठरत आहे उत्पादन खर्च जास्त उत्पादन कमी अशी शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे शेतकरी दिवसेंदिवस महागाईच्या तडाख्यात भरडला जात आहे नापिकेने शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे शेतकऱ्यांना कापूस वेचणी करायला मजूर मिळणे कठीण झाले आहे वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत असल्याने पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे तसेच यावर्षी कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे तसेच सोयाबीन पिकावर अनेक रोगराई आल्याने सोयाबीन ने दगा त्यानंतर शेतकऱ्यांची भिस्त कापूस पिकावर अवलंबून आहे दरवर्षी शेतकरी मोठ्या प्रमाणात कापूस पिकावर खर्च करतात मात्र यंदाचे वातावरण पाहता कापूस पिकावर केलेला खर्च भरून निघणार की नाही असे चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे त्यातच कापसाच्या दरही कमी असल्याने लावलेला खर्चही निघणे कठीण झाले आहे. राळेगाव तालुका व इतरही तालुक्यात अशीच परिस्थिती आहे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात महिनाभऱ्यापासून कापूस वेचणी झाली नसल्याने सर्व शेत शिवार पांढरही पांढर दिसू लागले आहे परंतु कापसाला मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे पांढरे सोने अजूनही शेतात असल्याचे चित्र दिसत आहे.कापसाला केवळ सहा हजार पाचशे रुपये भाव कापूस पिकावर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो परंतु खर्च करूनाही कापूस पिकेल याची कोणती शाश्वती राहत नाही अनेकदा कापूस पिकावर केला जाणारा खर्चही भरून निघत नाही अशी शेतीची बिकट अवस्था असते या तुलनेत कापसाला चांगला दर असणे अपेक्षित आहे परंतु यंदा खाजगी बाजारपेठेत सुरुवातीला सात हजार रुपये भावाने कापूस खरेदी केला त्यानंतर आता तर चक्क सहा हजार पाचशे रुपये पासून खरेदीदार कापूस खरेदी करत असून शेतकऱ्यांची मोठी लूट केली जात आहे