ढाणकी शहराजवळून जात असलेल्या महामार्गाला पडत असलेल्या भेगावर लोकप्रतिनिधी गप्प की, “मोनम सर्वसाधनम हेतुपुरेसर अर्थपूर्ण दुर्लक्षम”


प्रतिनिधी :प्रवीण जोशी ,ढाणकी


सर्वत्र सर्व दूर महामार्गाचे काम चालू असताना रस्त्याचे काम अनेक ठिकाणी अर्धवट आहे व सुस्तपणे होत असलेल्या कामामुळे अनेक तरुणांचा बळी गेला तसेच काही दिवसापूर्वी विवाह झालेल्या तरुणांचा बळी गेला तर अनेक संसार उध्वस्त झाले या होत असलेल्या कामामुळे जरी प्रगतीचा मार्ग म्हणून या मार्गाकडे बघावयाचे असले तरी तरुणांचे बळी जास्तीच जास्त गेले हे आपण अनेक वर्तमानपत्रात वाचले व दूरचित्रवाणी बघितले सुद्धा. भारतात सर्वात जास्त तरुण आहेत असे एका जागतिक संस्थेने जाहीर केले पण तरुणाची अशा पद्धतीने होणाऱ्या महामार्गामुळे मृत्यू होत असतील तर हे खूप चिंतेची बाब असून देश हा महासत्तेकडे वाटचाल करतो आहे आणि देशाला विकसनशील व विकसित करायचे असल्यास तरुणाच्या शक्तीची नितांत गरज असून अशा पद्धतीने जर वारंवार रस्त्याच्या अर्धवट व दर्जाहीन कामामुळे आणि होत असलेल्या विलंबामुळे अनेक तरुणांचे बळी गेल्यामुळे सदर अशा बेजबाबदार काम करणाऱ्या कंपनीवर सदोष म्हणून शोधाचा गुन्हा का दाखल होऊ नये….??? असे सर्वसामान्यांना वाटणे साहजिक आहे विशेष म्हणजे ढाणकी ते फुलसावंगी या राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू असताना वर्षातच जर अर्धा अर्धा किलोमीटर पर्यंत भेगा पडत असतील तर होत असलेल्या कामावर व त्याच्या गुणवत्तेवर सर्वसामान्यांनी दर्जाहीन प्रश्नाची सरबत्ती का करू नये. हा रस्ता करणाऱ्या कंपनीला शासकीय यंत्रणा पाठीशी घालत आहे का तसेच रस्ता तयार करत असताना कंपनीचे मोठे मोठे वाहने जातात त्यामधून गिट्टी पडते त्यामुळे येणाऱ्या काळात वाहन घसरून अपघात सुद्धा होऊ शकतो मग अपघात झाल्यानंतर कंपनी सदर गिट्टी बाजूला सारण्याचे काम करेल का असा प्रश्न यावेळेस निर्माण होतो या महामार्गाचे काम होत असताना जनतेला एक आगळावेगळाच प्रत्यय येतो आहे आपणास सर्वश्रुत ज्ञात आहे की उसापासून साखर व गूळ तयार होतो पण फुलसावंगी ते ढाणकी या महामार्गाचे काम होतात असताना बेशरम मधून गूळ काढण्याचा प्रत्येय येतो अर्थातच बेशरम मधून कधीच गूळ निघत नाही व या कंपनीकडून सुद्धा दर्जेदार कामाचे कामाची अपेक्षा करायची नाही का हे सर्वसामान्यांनीच ठरवावे. तसेच लोकप्रतिनिधींनी कशा प्रकारचा निधी आपल्या मतदारसंघाला खेचून आणला हे वेळोवेळी आपल्या लेखणीतून मांडणारे च्याव आणि म्याव यांनी या महामार्गावरून कधी प्रवास केला नसेल का? जर प्रवास केला असेल तर मग एरवी लोकप्रतिनिधी बद्दल हात हात भर पोस्ट लिहिणारे गेले कुठे लोकप्रतिनिधी यांनी याबाबत कंपनीला कधी विचारणा केली का हात फिरवला की पोस्ट बनते अशी ज्याची महती असलेले रथी महारथी याबाबत एखादी पोस्ट तयार करतील का व असे झाल्यास त्यास “सोन्याची झळाळी” म्हणावे लागेल या बद्दल ” ब्र” शब्द निघत नसल्यामुळे प्रश्न उभा टाकतो की याबाबत त्यांची लेखणी बोचरी आणि बोथट झाली का महामार्गाला पडत असलेल्या भेगांबद्दल लोक प्रतिनिधीची भूमिका काय अशी एखादी पोस्ट लिहिण्याची तसदी च्याव व म्याव यांनी घेतली पाहिजे तसेच महामार्ग होत असताना शेतकऱ्यांनी जाणे येणे कसे करावे याचा सुद्धा शासनाने विचार केलेला दिसत नाही महामार्ग होत असताना शेतजमिनी पासून दहा फुटाच्या पेक्षा उंच होत असलेल्या महामार्गामुळे शेतकऱ्यांना आपली वाहने गाडी बैल आणि रोज कसे जाणे करायचे हा सुद्धा ज्वलंत प्रश्न असून हा प्रश्न सुद्धा लोकप्रतिनिधींच्या पिलावळांना दिसत नाही…??