राळेगाव बस स्टँड परिसरात चोरीच्या प्रमाणात वाढ

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

 

राळेगाव बस स्थानक परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात चोरीला उधान आल्याचे दिसून येत आहे, राळेगाव तालुका हा खूप मोठा असून तालुक्यातील विद्यार्थी नेहमी वर्धा यवतमाळ तसेच राळेगाव येथे ये जा करीत असतात परंतु काही दिवसापासून शहरातील बस स्थानक परिसरात प्रवाशांचे मोबाईल व इतर वस्तू चोरीला गेल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दाखल झाली आहे, राळेगाव बस स्थानकात कोणतीही सुविधा दिसून येत नाही,मुत्रीघर व संडास हा बसस्थानकाकरिता सर्वात मोठे घाणीचे साम्राज्य असल्याचे निदर्शनात येत आहे, तसेच पिण्याचे पाण्याची सुविधा सुद्धा पाहिजे त्या प्रमाणात दिसून येत नसल्याने व बस स्थानक परिसरात आलेल्या बस ह्या व्यवस्थित आपल्या थांब्यावरती व्यवस्थित उभ्या नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र राळेगाव बस स्थानक परिसरात दिसून येते, याची विचारणा केली असता याकडे बस स्थानक प्रमुख किंवा संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे का? असा प्रश्न प्रवासी वर्गात निष्पन्न झाल्याचे चिन्ह निष्पन्न होत आहे, तरी याकडे संबंधित राळेगाव आगाराने व बस स्थानक प्रमुखांनी गांभीर्याने व बस स्थानक प्रमुखांनी या बाबीकडे लक्ष केंद्रित करून प्रवाशात सुख सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी जनतेतून होत आहे. बॉक्स प्रतिक्रिया बस स्थानक प्रमुख सविता फुलझेले आम्ही प्रियांशी कंपनीला एस टी महामंडळाने प्रियाशी कंपनीला साफ सफाईची कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे आणि ते नियमित साफसफाई करतात आणि पाणपोई सुरू केलेली आहे, त्या मुळे पाण्याची सुधा व्यवस्था आहेत चोरीच्या संदर्भात आमच्याकडे कोणतेही तक्रार नसल्याने यावर आम्ही काहीही प्रतिक्रिया देवू शकत नाही. परंतू राळेगाव पोलीस स्टेशन दक्ष. राळेगाव शहरात साप्ताहिक बाजार असल्याने व मुख्य मार्गावर लागलेल्या व्यवसायामुळे ये जा करणाऱ्यास होत असलेल्या त्रासा मुळे व पहिले झाल्याल्या अपघाताचा पुरावा लक्ष्यात घेवून आज सुधा सर्व मार्ग मोकळा पेट्रोलिंग करताना करून घेताना दिसून येत आहे.