
महागाव प्रतिनिधी : संजय जाधव
बंदी भागातील अतिदुर्गम भागातील कोर्टा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत, बावीस गावाचा व्याप असून, या प्रत्येक गावामध्ये सध्याच्या परिस्थितीत मलेरिया, हिवताप, डेंगू अशा अनेक आजारांची साथ पसरली असून, या प्राथमिक आरोग्य केंद्रात बऱ्याच वर्षापासून राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पदे रिक्त असून, यामध्ये आरोग्य सेविका व आरोग्य परिचर तसेच महिला पदांची अनेक वर्षापासून पदे रिक्त असून, या दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची नजर का जात नसावी ? वारंवार लेखी स्वरूपात पदे रिक्त असल्याबाबत सूचना देऊनही आजपर्यंत पदे भरण्यात का आली नाही? यामध्ये शासनाचे नियम दुर्गम भागात ज्यांची पदाची नियुक्ती झाली असेल, त्यासमोरील कर्मचाऱ्यांना तू त्या केंद्रात जाऊ शकतो का? तर तो कर्मचारी त्या ठिकाणी मी जाऊ शकत नाही. तो दुर्गम भाग आहे. त्या ठिकाणी राहण्याची चांगली व्यवस्था नसल्यामुळे, आम्ही आमच्या सोयीनुसार शहरी भागात ड्युटी करणार, अशा उद्धट निकषामुळे कोर्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणीही कर्मचारी येण्यास नकार देत असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसापूर्वी एका आरोग्य सेवकाची कोर्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्ती झाली होती, तरी त्यांनी पदाधिकाऱ्यांमार्फत अधिकारी यांच्यावर दबाव आणून त्यांच्या सोयीनुसार दिग्रस दारव्हा या तालुक्यांमध्ये नियुक्ती करून घेतली. आज रोजी या प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी नसल्यामुळे घाणीचे साम्राज्य वाढल्याचे दिसून येत आहे. व या २२ गावातील पाणी नमुने तसेच रक्त तपासणी करिता आरोग्य सेवकाची कमतरता असल्यामुळे, बावीस गावातील नागरिकांना आपल्या जीवाची देखभाल करण्याकरिता खाजगी दवाखान्यात उपचार करावा लागत आहे. आज रोजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.एस. पी. दुबे हे २२ गावातील रुग्णांची तपासणी करत असल्याचे निदर्शनात येत आहे. तरी वरील दर्शविलेले रिक्त असलेल्या पदाचे तात्काळ मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. यवतमाळ यांनी प्रत्यक्षात मोका पाहणी करून, पदे भरण्यात यावी. अशी मागणी माजी पंचायत समिती उपसभापती विशाखाताई शंकर जाधव यांनी केली असून, रिक्त पदे पंधरा दिवसाच्या आत न भरल्यास, आमरण उपोषणाचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
