26/11 दहशतवादी हल्ल्यातील शहिद हुतात्म्यांना फौजी वॉरीयर्स तर्फ़े श्रद्धांजली

फौजी वाॕरीअर्स मार्शल आर्टस् वरोरा च्या वतीने आज दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ ला सायंकाळी ६-०० वाजता वरोरा येथिल शहीद योगेश डाहुले स्मारकावर मुंबई येथिल २६ / ११ ला झालेल्या भ्याड दहशदवादी हल्यात शहीद झालेल्या अमर हुतात्म्यांना श्रद्धांजली व संविधान दिन साजरा करण्यात आला .

फौजी वाॕरिअर्स च्या विद्यार्थ्यांना यावेळी २६/११ च्या दहशतवादी हल्याची पार्श्वभूमी व दहशतवाद्यानी हाच दिवस का निवडला याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले . विद्यार्थ्यांना देशासाठी कामी आलेल्या शहीदांविषयीचा आदर आणि सन्मान कायम स्मरणात रहावा हा या आयोजनाचा उद्देश होता . मार्गदर्शनानंतर मौन श्रद्धांजली पाळण्यात आली .

यावेळी फौजी वाॕरिअर्सचे पदक विजेते सर्व खेळाडू तसेच प्रशिक्षक डी एन खापने , प्रविण चिमूरकर , रवी तुराणकर , रवी चरुरकर , दौलत ढोके , सदभावना युवा एकताचे सर्व पदाधिकारी व वरोरावासी मोठ्या संख्येने उपस्थित होते .