राळेगाव तालुक्यातील अतिवृष्टीचे पैसे त्वरीत शेतकर्यांना द्या शिवसेनेची मागणी

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यात प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झाली त्यामध्ये शेतकर्याचे फार नुकसान झाले व शासनाने अत्यंत कमी पैसे नुकसान भरपाईचे दिले हे पैसे तहसीलदार साहेबाजवळ गेल्या २० ते २५ दिवसापासुन पडुन आहे पण शेतकर्याच्या खात्यात जमा झाले नाही याचा जाब विचारण्यासाठी शिवसेना तालुका राळेगाव चे पदाधिकारी तहसिलदार साहेबांना भेटण्याकरीता गेले असता तिथे वेगळीच भानगड दिसुन आली पटवारी संघटना म्हणते पैसे कृषी कार्यालयाचे कर्मचार्‍यानी यादी बनवुन वाटप करावे व कृषी कर्मचारी म्हणते पटवारी यांनी यादी करून पैसे वाटप करावे या दोघाच्या तमाशात शेतकरी आत्महत्येच्या मार्गावर आहे असे दिसुन आले . तहसीलदार साहेबानी पटवारी व कृषी कर्मचाऱ्यांना त्यांचा ऑफिस मध्ये बोलावून चर्चा केली असता दोघांनिही तहसीलदार साहेबांना यादी देण्यास नकार दिला पटवारी संघटनेची व कृषी कर्मचार्याची कोणती अडचण आहे ते समजले नाही . शेतकरी अडचणीत आहे व मुख्यमंत्री, कृषीमंत्री आपला दसरा मेळावा कसा मोठा होईल यासाठी महाराष्ट्रभर बसेस बुक करत आहे . याचा शिवसेना तिव्र निषेध करत आहे . हा सर्व तमाशा शिवसेना जिल्हाप्रमुख विश्वासभाउ नांदेकर , शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब मुनगीनवार, यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष भाउ ढवळे , जिल्हाप्रमुख राजेन्द्रभाउ गायकवाड , प्रविण शिंदे यांना सांगीतला असता त्यांनी त्वरीत आपली यंत्रणा सुरु केली व विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांना शासन कारभार कळविला . जिल्हाधिकारी अमोलजी येडगे यांना जिल्हाप्रमुख विश्वासभाउ नांदेकर यांना हा प्रकार कळविला असता या प्रकरणाची चौकशी करून येत्या दोन ते तिन दिवसात शेतकर्याच्या खात्यात पैसे जमा होईल असे आश्वासन दिले . जर शेतकर्यांचे पैसे त्यांना लवकर मिळाले नाहीतर शिवसेनेच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन करून संबंधीत दोषी कर्मचार्‍या वर कार्यवाही कायदेशिर करण्यात येईल असे निवेदन शिवसेनेतर्फे तहसीलदार रविन्द्र कानडजे साहेब यांना चर्चा करून देण्यात आले त्यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख विनोद काकडे, शहरप्रमुख राकेश राउळकर , शंकर गायधने, संतोष कोकुलवार नगरसेवक तथा बांधकाम सभापती , धनराजजी श्रीरामे, इमरान पठाण शहरसंघटक, महेन्द्र तुमाने , उपतालुका प्रमुख विजय पाटील, शेषराव ताजणे, प्रशान्त वान्हेकर , योगेश मलोन्डे युवासेना शहरप्रमुख , डॉ. संजय पवार , सुरेन्द्र भटकर, श्रीकान्त महाजन , सुनिल सावरकर, अमोल राउत युवासेना तालुकाप्रमुख , दिपक येवले, विजय शेन्डे,किसन वैद्य , अजय झाडे , भोला एकोणकर , सुनिल शिरसागर , हनुमान डाखोरे , गणेश जामुनकर , जिवन रामगडे, रोशन इरपते, मनोज राउत, अखील निखाडे युवासेना उपतालुका प्रमुखमनोज वाकुलकर विभाग प्रमुख , नानाजी वनस्कर विभाग प्रमुख व असंख्य शेतकरी व शिवसैनिक उपस्थित होते .

.